शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्कुल बस चालकांची होतेय उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST

लातूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या, परिणामी स्कुलबसची चाकेही थांबली. महिना, दोन महिने, तीन ...

लातूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या, परिणामी स्कुलबसची चाकेही थांबली. महिना, दोन महिने, तीन महिने वाट बघून काहींनी नोकरी सोडून गाव गाठले. तर काही स्कुलबस चालक, मालकांनी नवीन व्यवसाय सुरू केला आहे. संसाराचा गाडा बसवरच अवलंबून असणारे अनेक मालक विविध अडचणींचा सामना करीत आहेत.

लातूर जिल्ह्यात जवळपास दीड ते दोन हजार स्कुलबसची संख्या असली तरी केवळ ७०० लोकांकडे त्याचा परवाना आहे. विनापरवाना विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या यापेक्षा दुप्पट आहे. लातूर, उदगीर व अहमदपूर शहरात स्कुलबसची संख्या लक्षणीय आहे. याशिवाय ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी खाजगी वाहने आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या, बारा महिने विद्यार्थी वाहतूक एवढाच व्यवसाय करणारे बसमालक आणि चालक दोघेही अडचणीत सापडले आहेत. काहींनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला असून काहींनी मजुरीला पसंती दिली आहे. अनेकांनी कर्जाचे हप्ते थकल्याने बसच बाहेर काढल्या नाहीत. मागील आठ महिन्यांपासून चालक आणि मालक दोघेही शाळा कधी सुरू होणार याकडे लक्ष देऊन आहेत.

भाजीपाला विक्री, बांधकाम मजुरी...

विद्यार्थी वाहतूक करून मिळणाऱ्या उत्पन्नावरच घरगाडा चालविणारे अनेकजण भाजीपाला विक्रीकडे वळले आहेत. काहींनी हिवाळ्यात उबदार कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. तर चालक म्हणून काम करणारे बरेचजण गावी परतले. शहरातील काहींनी मजुरी सुरू केली. जेव्हा शाळा सुरू होतील, पालक प्रतिसाद देतील, तेव्हाच गाडी धावणार असल्याचे चालकांनी सांगितले.

बसेस जागेवरच उभ्या...

लॉकडाऊन झाल्यापासून बसेस जाग्यावर उभ्या आहेत. कर्जाचे हप्ते थकल्याने बँकांनी तगादा लावला आहे. दंडाची रक्कम वाढली. शासनाने स्कुलबस चालकांना आधार देण्यासाठी थकित कर्ज माफ करावे. बँका, फायनान्स कंपन्यांच्या छळातून दिलासा देण्यासाठी उपायोजनना कराव्यात. आता दहावीचे वर्ग सुरू झाले असले तरी पालकांचा फारसा प्रतिसाद नाही. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. - युसूफ फारूखी, बस मालक

कधी तरी लग्नाचे भाडे केले...

आठ महिन्यांपासून बसेस शाळेत लावल्या आहेत. चालकही सोडून गेले. थकित कर्ज भरण्यासाठी बँकांकडून वारंवार तगादा आहे. कधीतरी एखाद दुसरे लग्नाचे भाडे लागते, त्यातून मेंटनन्सचा खर्च भागविला. केवळ बसवरच उपजिविका असणारे अनेकजण हा व्यवसाय सोडून इतर कामाला लागले आहेत. बालाजी नागिमे, बस मालक