बससेवा सुरू झाल्याने चालक, वाहकाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST2021-09-17T04:24:59+5:302021-09-17T04:24:59+5:30

चाकुर तालुक्यातील वडवळच्या प्रवाशांची तालुक्याला व नळेगाव, शिरुर अनंतपाळ, निलंगा येथे जाण्यासाठी बस सुरू करण्याची मागणी होती. त्यामुळे बस ...

Respect to the driver and carrier for starting the bus service | बससेवा सुरू झाल्याने चालक, वाहकाचा सत्कार

बससेवा सुरू झाल्याने चालक, वाहकाचा सत्कार

चाकुर तालुक्यातील वडवळच्या प्रवाशांची तालुक्याला व नळेगाव, शिरुर अनंतपाळ, निलंगा येथे जाण्यासाठी बस सुरू करण्याची मागणी होती. त्यामुळे बस सुरू करण्यात आली आहे. या बसमुळे कमी अंतर व प्रवास भाडेही कमी पडत असल्याने महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार आहे. सध्या संजीवनी बेटाची जत्रा सुरू असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. या वेळी चालक कमलाकर मुळे, वाहक विमल शिंदे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रामस्थांकडून विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख, वाहतूक निरीक्षक मिरजकर, आगार प्रमुख बाळासाहेब राठोड, स्थानक प्रमुख ए.आर. पवार यांचे आभार मानण्यात आले. या वेळी सरपंच मुरलीधर सोनकांबळे, उपसरपंच बालाजी गंदगे, ॲड. वैभव पाटील, राजकुमार मोव्हनाळे, व्यंकटी सुनपे, बाळासाहेब फुलारी, धोंडीराम जगावे, बापूराव भांगे, सोमनाथ नवने, सतीश शिंदे, सुरेश कसबे, हनमंत बरले, दस्तगिर शेख, विजय कापसे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Web Title: Respect to the driver and carrier for starting the bus service