शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लातूरला दिलासा; मांजरा प्रकल्प मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात !

By हणमंत गायकवाड | Updated: July 25, 2024 16:50 IST

‘मांजरा’वरील महासांगवी १००, तर संगमेश्वर ३० टक्के भरल्याने धरणात येवा वाढला

लातूर : लातूर शहरासह केज, अंबाजोगाई, कळब, धारूर या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारा मांजरा प्रकल्प मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात आला आहे. मांजरा प्रकल्पावरील महासांगवी मध्यम प्रकल्प १०० टक्के आणि त्याखाली असलेला संगमेश्वर मध्यम प्रकल्प ३० टक्के भरल्याने धनेगाव येथील मांजरा धरणात येवा सुरू झाला आहे.

या पावसाळ्यात आतापर्यंत ६.४४ दलघमी नवीन पाणी मांजरा धरणात आले आहे. यामुळे लातूरला दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर मांजरा प्रकल्प लवकरच भरेल. सद्य:स्थितीत धरणात मृतसाठा सोडून ०.१५२ दलघमी जिवंत साठा झाला आहे.

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पाच्या वर पाटोदा तालुक्यात महासांगवी मध्यम प्रकल्प आहे. पाच दलघमी क्षमतेचा हा प्रकल्प असून तो १०० टक्के भरला आहे. तर त्याखाली भूम तालुक्यात संगमेश्वर मध्यम प्रकल्प असून त्याची क्षमता १६ दलघमी आहे. प्रकल्प ३० टक्के भरला आहे. कालपासून मांजरा प्रकल्प क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. बुधवारी प्रकल्प क्षेत्रात ३० मिमी पाऊस झाला. त्यामुळे धनेगाव मांजरा प्रकल्पात येवा सुरू झालेला आहे.

मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५०४ मिमी पाऊस...
मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५०४ मिमी पाऊस झाला आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये ३० मिमी पावसाची नोंद झाली असून मांजरा प्रकल्पात या पावसाळ्यात ६.४४ दलघमी नवीन पाणीसाठा झालेला आहे. गुरुवारी सकाळी मांजरा प्रकल्प मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात आला असल्याची माहिती प्रकल्प शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली.

मांजरा प्रकल्पाची स्थिती..
पाणीपातळी : ६३५.७३ मी/ ६४२.३७ मी.
एकूण पाणीसाठा दलघमी : ४७.२८२/२२४.०९३
मृतसाठा दलघमी : ४७.१३०/ ४७.१३०
जिवंत साठा दलघमी : ०.१५२/ १७६.९६३
जिवंत पाणीसाठा टक्केवारी : ०.०९
आवक दलघमी : ०.६०७/ ६.४४२
आवक दर : ७.०३ क्युसेक/ २४८.२२ क्युसेक

थेंबे-थेंबे तळे साचेल
मांजरा नदीचा उगम पाटोदा तालुक्यातील उगलवाडी येथे असून पाटोदा तालुक्यातच महासांगवी आणि भूम तालुक्यात संगमेश्वर येथे या नदीवर दोन मध्यम प्रकल्प आहेत. त्यातील महासांगवी प्रकल्प भरला असून संगमेश्वर मध्यम प्रकल्पामध्ये चांगला येवा सुरू झालेला आहे. त्यामुळे धनेगाव येथील मांजरा धरणात पाण्याची आवक संथ गतीने सुरू आहे. थेंबे-थेंबे तळे साचेल.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणlaturलातूर