शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

Latur Paper Leak: फार्मसीचा पेपर व्हायरल, प्राध्यापकाविरोधात गुन्हा, केंद्रप्रमुख आला गोत्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:22 IST

लातूर येथील कातपूर रोडवरील ‘कॉलेज ऑफ फार्मसी’ येथे बी. फार्मसी परीक्षेचा पेपर नियोजित वेळेपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी लातुरातील विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात एका साहाय्यक प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर: शहरातील कातपूर रोडवरील ‘कॉलेज ऑफ फार्मसी’ येथे बी. फार्मसी परीक्षेचा पेपर नियोजित वेळेपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी लातुरातील विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात एका साहाय्यक प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी बी. फार्मसी अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा सुरू होती. या केंद्रावर साहाय्यक प्राध्यापक अतुल लिंबराज कदम यांची ‘केंद्रप्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, दुपारी १:२२ वाजता त्यांनी ‘एनएम-४५' या विषयाची प्रश्नपत्रिका संगणकावरून डाउनलोड केली. मात्र, दुपारी १:४५ वाजता हीच प्रश्नपत्रिका ‘केंद्र कोड ९७३’ सह विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर व्हायरल झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आले. विद्यापीठाने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये हा गैरप्रकार निष्पन्न झाला. त्यानंतर कॉलेजचे प्राचार्य श्रीनिवास बच्चुय्या बुमरेला यांनी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अतुल कदम या साहाय्यक प्राध्यापकाविरोधात ‘महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळ आणि इतर निर्दिष्ट परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम’ कलम ३ आणि ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. व्ही.एस. मुळे हे तपास करत आहेत. परीक्षेच्या गोपनीयतेचा भंग करून पेपर व्हायरल करण्यामागे आणखी काेण आहे का? याचाही शोध आता पोलिस घेत आहेत. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Pharmacy Paper Leaked, Professor Booked, Exam In-charge Implicated

Web Summary : A pharmacy paper leak in Latur led to a professor's arrest. Atul Kadam, the exam in-charge, allegedly leaked the paper before time, triggering a police investigation and causing an uproar in educational circles. Further investigation is underway.
टॅग्स :laturलातूरMaharashtraमहाराष्ट्र