लसीकरणाला कासवगती; ज्येष्ठांचा दुसरा डोस वेटिंगवर, केवळ १८-४४ वयोगटांत लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:20 AM2021-05-09T04:20:38+5:302021-05-09T04:20:38+5:30

लातूर : मागणी तसा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरणाला अडथळे येत आहेत. सध्या लस उपलब्ध नसल्याने केवळ १८ ते ४४ ...

The pace of vaccination; The second dose of seniors on vaccination, vaccinated only in the age group of 18-44 years | लसीकरणाला कासवगती; ज्येष्ठांचा दुसरा डोस वेटिंगवर, केवळ १८-४४ वयोगटांत लस

लसीकरणाला कासवगती; ज्येष्ठांचा दुसरा डोस वेटिंगवर, केवळ १८-४४ वयोगटांत लस

Next

लातूर : मागणी तसा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरणाला अडथळे येत आहेत. सध्या लस उपलब्ध नसल्याने केवळ १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना लस दिली जात आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा दुसरा डोस वेटिंगवर आहे. अनेकांची मुद्दत संपली आहे. मात्र, लस उपलब्ध नसल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

जिल्ह्यात १० ते १५ हजार डोस देण्याची क्षमता जिल्ह्यात आहे. त्यासाठी १७१ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत, परंतु शासनाकडून लस उपलब्ध होत नसल्याने सर्वच केंद्र सुरू नाहीत. आज घडीला केवळ १५ केंद्र सुरू आहेत. तेही १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थ्यांसाठी. ४५ वर्षांपुढील वयोगटांसाठी लस उपलब्ध नाही. त्यामुळे ज्येष्ठांचा दुसरा डोस वेटिंगवर आहे. आतापर्यंत २ लाख ७ हजार ३३२ जणांनी लस घेतली आहे, तर दुसरा डोस ४० हजार ९६ जणांनी घेतला आहे. दोन्ही डोस मिळून २ लाख ४७ हजार ४२८ झाले आहेत. लाभार्थी संख्या १७ ते १८ लाखांच्या आसपास असताना केवळ २ लाख ७ हजार ३३२ जणांना लस घेता आली आहे.

४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी १२ हजार डोस आल्याचे समजले होते, परंतु ते हातोहात संपल्याने आम्हाला दुसरा डोस घेता आला नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर दुसरा डोस दिला जाईल, असे केंद्रातील डाॅक्टरांनी सांगितले. आता वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.

- लक्ष्मण धनाजी श्रीमंगले

पहिला डोस घेऊन सहा आठवडे झाले आहेत. लस घेतेवेळी चार आठवड्यांनंतर दुसरा डोस घेण्यास सांगितले होते, परंतु मध्यंतरी शासनाकडून कालावधी वाढविण्यात आला आणि आता डोस उपलब्ध नसल्यामुळे थांबावे लागत आहे.

- पांडुरंग गायकवाड

४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी वेगळे केंद्र, तर १८ ते ४४ वयोगटांसाठी वेगळे केंद्र आहेत. त्यामुळे नागरिकांना कुठल्या केंद्रावर कोणासाठी लस मिळते, हे कळत नाही. यामुळे गैरसाेय होत आहे. कोणत्याही केंद्रावर सर्वच वयोगटांत लस मिळायला पाहिजे.

- सलीम शेख

१८ ते ४४ वयोगटांत नोंदणी, अपाॅइंटमेंट आवश्यक

१८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थ्यांनी कोविड पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे, तारीख, वेळ आणि केंद्र निश्चित करून लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जावे. ऑनलाइन नोंदणी व ऑनलाइन अपाॅइंटमेंट या वयोगटात अनिवार्य आहे. अपाॅइंटमेंटशिवाय या वयोगटात लस दिली जात नाही. ४५ वर्षांपुढील लाभार्थ्यांसाठी लातूर जिल्ह्यात लस उपलब्ध नाही. साठा प्राप्त होत नाही, तोपर्यंत लसीकरण होणार नाही. त्यामुळे नागरिकांना वेटिंग करावी लागत आहे.

लस नसल्यामुळे लसीकरण केंद्र बंद...

२ लाख ७ हजार ३३२ जणांनी पहिला डोस घेतलेला आहे, तर यातील ४० हजार ९६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १ लाख ६७ हजार २३६ जणांना सध्या लस नाही. यातील अनेक जणांची मुदत संपलेली आहे. कोणाला ५, कोणाला ६ तर कोणाला ७ आठवडे झाले आहेत. त्यामुळे त्यांना दुसरा डोस घेण्याची प्रतीक्षा आहे, परंतु जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ४५ वर्षांपुढील लसीकरण केंद्रच सध्या बंद केली आहेत.

Web Title: The pace of vaccination; The second dose of seniors on vaccination, vaccinated only in the age group of 18-44 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.