शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

टोकाचे पाऊल उचलू नका; ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी एकजुटीने संघर्ष करू: छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 13:16 IST

जीवन संपविलेल्या भरत कराड कुटुंबीयांचे सांत्वन करत भुजबळ म्हणाले, "तो ओबीसी समाजाचा पहिला शहीद." 

रेणापूर (जि. लातूर) : जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत तुम्ही असले आत्महत्येचे मार्ग अवलंबू नका. राज्यात ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने संघर्ष करू, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी येथे सांगितले. रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण दिल्याने आता ओबीसी आरक्षण संपणार या भीतीपोटी बुधवारी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ शुक्रवारी गावात आले होते.

यावेळी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, लातूर ग्रामीणचे आ. रमेश कराड, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे, ॲड. सुभाष राऊत, विजय गंभीरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ग्रामस्थांच्या उपस्थितीत भरत कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कोणीही टोकाचे पाऊल उचलू नयेमंत्री छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी समाजबांधवांनी लढा उभारून स्वातंत्र्यानंतर ज्या पद्धतीने आरक्षण मिळवले, त्याचप्रमाणे आता हे आरक्षण टिकवण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन आमच्यासोबत लढावे, संघर्ष करावे, मात्र कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या कुटुंबाला रस्त्यावर सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आरक्षणावर गदा येऊ देणार नाहीजोपर्यंत मी आहे तोपर्यंत ओबीसी आरक्षणावर गदा येऊ देणार नाही. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे. त्यांना आरक्षण मिळाले आहे. त्यांना आणखीन मिळो. परंतु ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण मिळू देणार नाही. आमच्या ३५४ छोट्या-छोट्या जातीच्या, अठरापगड जातीच्या लोकांवर अन्याय होऊ देणार नाही. हा ओबीसी समाजाचा पहिला शहीद आहे, यापुढे कोणीही असे टोकाचे पाऊल उचलणार नाही. कराड कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्थानिकचे लोकही घेतील व आम्हीही घेऊ, अशी ग्वाही मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

कोणीही आततायीपणा करू नयेमाजी मंत्री आ. मुंडे म्हणाले, सरकार सजग आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धोका होणार नाही, याची काळजी घेतली आहे. कोणीही आततायीपणा करू नये. या प्रकरणात सरकारच्या वतीने जी मदत करायची ती जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या राज्यात सर्व अठरापगड जाती एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहतील, यासाठी प्रयत्न करावेत.

मुलांच्या शिक्षणाची आ. कराड यांनी घेतली जबाबदारीमयत भरत महादेव कराड यांना तीन मुली व एक मुलगा आहे. कराड हे ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या मुलांची व कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी आपण घेत आहोत. त्यांना कसल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही लातूर ग्रामीणचे आ. रमेश कराड यांनी दिली.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळlaturलातूर