डेंगू,मलेरियाची साथ उद्भवू नये म्हणून हिवताप विभाग सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST2021-06-10T04:14:33+5:302021-06-10T04:14:33+5:30

लातूर जिल्ह्यात डेंगू आजाराचा सध्या एकही रुग्ण नाही. संशयित रुग्ण म्हणून दोघा जणांवर उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णांची ...

Malaria department warns of dengue and malaria | डेंगू,मलेरियाची साथ उद्भवू नये म्हणून हिवताप विभाग सतर्क

डेंगू,मलेरियाची साथ उद्भवू नये म्हणून हिवताप विभाग सतर्क

लातूर जिल्ह्यात डेंगू आजाराचा सध्या एकही रुग्ण नाही. संशयित रुग्ण म्हणून दोघा जणांवर उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाली असून, संबंधित गावांमध्ये अबॅटिंग मोहीम व धूर फवारणी करण्यात आली आहे. शिवाय, डासोत्पत्ती ठिकाणी नष्ट करण्यात येत आहेत. जिल्ह्यात २०१६ मध्ये डेंग्यूची ५५ रुग्ण होती. तर सतरा मध्ये दहा रुग्ण, अठरा मध्ये ७२ आणि २०१९ मध्ये ८५ रुग्ण होती. २०२० मध्ये फक्त दोन रुग्ण होती. चालू वर्षात एकही रुग्ण नाही. तरी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे.

अशी घ्या काळजी....

डासोत्पत्ती होऊ नये म्हणून कोरडा दिवस पाळणे. पाण्याचे साठे झाकून ठेवणे. नाल्या वाहत्या करणे. अंगभर कपडे वापरणे. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे. अबॅटिंग फवारणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे. डासोत्पत्ती झाल्यास धूर फवारणी करणे तसेच डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडणे जेणेकरून आया तयार होणार नाहीत.

कोट....

जिल्ह्यात सध्या डेंगू व अन्य साथ आजारांची रुग्ण नाहीत. पण पावसाळ्यातील साथ आजाराबाबत काळजी घ्यावी लागेल. डास चावल्यामुळे डेंग्यू होतो. त्यासाठी डासो उत्पत्ती होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे. पाण्याचे साठवणूक टँक झाकून ठेवावेत. कोरडा दिवस पाळावा.

- डॉ.आर आर. शेख, जिल्हा हिवताप अधिकारी

Web Title: Malaria department warns of dengue and malaria