महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा त्वरित लागू करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST2021-09-18T04:21:24+5:302021-09-18T04:21:24+5:30

अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलने झाली. त्यानंतर केंद्र सरकारने लोकपाल कायदा मंजूर केला. राज्यात लोकायुक्त ...

The Lokayukta Act should be implemented in Maharashtra immediately | महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा त्वरित लागू करावा

महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा त्वरित लागू करावा

अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलने झाली. त्यानंतर केंद्र सरकारने लोकपाल कायदा मंजूर केला. राज्यात लोकायुक्त कायदा लागू करावा यासाठी अण्णा हजारे यांनी सात दिवसांचे उपोषणही केले. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून आंदोलनास पाठिंबा दिला होता. तत्कालीन भाजप सरकारने मसुदा समिती नेमली. समितीच्या अनेक बैठका झाल्या असून, मसुदा अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित बैठका घेण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. लोकायुक्त कायदा नसल्यामुळे भ्रष्टाचार वाढत आहे. त्यासाठी लोकायुक्त कायदा मंजूर करण्याची गरज आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर हनिफभाई शेख, बासिदखान पठाण, सुधीर पुरी, दिलीप शिंदे, नामदेव कारभारी, बाबूअप्पा मिटकरी, राजू शेख, हनुमंत जोगदंड, निसार शेख, दत्ता शिंदे, माधव स्वामी, बाळासाहेब स्वामी, गणेश मदने, खय्युम शेख, बाबुराव गायकवाड यांची नावे आहेत.

Web Title: The Lokayukta Act should be implemented in Maharashtra immediately