लोकसहभागातून ग्रीन वलांडी अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:57+5:302021-06-18T04:14:57+5:30

यावेळी सरपंच राणीताई भंडारे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभय साळुंके, माजी सरपंच राम भंडारे, उपसरपंच महेमुद सौदागर, सोनू डगवाले, ...

Launch of Green Valandi Campaign through public participation | लोकसहभागातून ग्रीन वलांडी अभियानास प्रारंभ

लोकसहभागातून ग्रीन वलांडी अभियानास प्रारंभ

यावेळी सरपंच राणीताई भंडारे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभय साळुंके, माजी सरपंच राम भंडारे, उपसरपंच महेमुद सौदागर, सोनू डगवाले, पंचायत समितीचे माजी सभापती संजय रेड्डी, माजी सरपंच पुंडलिक बिरादार, व्यापारी कमिटीचे अध्यक्ष उमाकांत नागलगावे, बालाजी वळसंगीकर, शादुल बौडीवाले, रवी स्वामी, शिवाजी जगताप, मुस्ताक कादरी, रवी गायकवाड आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड- संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. देणगीदारांच्या नावे गावातील सार्वजनिक जागेवर वृक्ष लावण्यात येणार आहेत. तसेच रोख रक्कम, श्रमदान, वृक्षदान, काळी माती, ट्री गार्ड आदी स्वरूपात नागरिकांना मदत करता येणार आहे. या अहवाहनाला प्रतिसाद देत लातूर येथील ग्रीन लातूर वृक्षचे सोनू डगवाले यांच्या वतीने १०० रोपे तर वलांडीतील सहशिक्षिका सुरेखा गरड यांनी ५२ रोपे देऊन या वृक्ष लागवड मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस चौकी परिसर, मस्जिद परिसर व केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

कोरोनाच्या संकटाच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवल्याने लोकसहभागातून ग्रीन वलांडी अभियान राबविण्यात येत आहे. त्यात गावातील युवक, महिला बचत गट, व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच राणीताई भंडारे यांनी केले.

Web Title: Launch of Green Valandi Campaign through public participation