जगत् जागृती विद्यामंदिरचे घवघवीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:25+5:302021-07-19T04:14:25+5:30

विद्यालयातील सृष्टी तोंडारे हिने शंभर टक्के गुण घेत सर्वप्रथम आली आहे. शाफिया शेख हिने ९९.८० टक्के व अर्थव पाटील ...

Jagat Jagruti Vidyamandir's resounding success | जगत् जागृती विद्यामंदिरचे घवघवीत यश

जगत् जागृती विद्यामंदिरचे घवघवीत यश

विद्यालयातील सृष्टी तोंडारे हिने शंभर टक्के गुण घेत सर्वप्रथम आली आहे. शाफिया शेख हिने ९९.८० टक्के व अर्थव पाटील ९९.८० टक्के गुण घेऊन द्वितीय आले. नंदिनी कोरे हिने ९९.२० टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. तसेच विद्यालयातील मेघराज ब्याकुडे, अलोक पाटील, स्नेहा वाघमारे, सोहम केंद्रे, आशिष सोमवंशी, फिरदोस शेख, रोहन रोडगे, संपदा सूर्यवंशी, रुद्रा पाटील, मोहिनी सूर्यवंशी, किरण कांबळे, वृषाली वाघमारे यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतले आहेत. नंदिनी व्होट्टे, शबनम पठाण, ओमकार भोसले, वेदांत तेलंगे, पूर्वा डिगोळे, राजीव चव्हाण, अर्पिता हिप्पाळे, सुमित सोनकांबळे हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेसाठी विद्यालयातील २१२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विद्यालयाचा एकूण निकाल शंभर टक्के लागला आहे. विशेष प्राविण्यासह ७३, प्रथम श्रेणीत ९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संस्थाध्यक्ष सर्वोत्तमराव कुलकर्णी, सचिव नरेश पाटील, उपाध्यक्ष ॲड. सुधाकरराव मोतीपवळे, कोषाध्यक्ष सोमनाथ स्वामी, सहसचिव बाबुराव बिडवे, सदस्य ॲड. विक्रम पाटील, विठ्ठलराव सोनटक्के, अर्जुन मद्रेवार, शिवप्रसाद शेटे, महादेव काळोजी, राजकुमार कदम, मुख्याध्यापक प्रल्हाद तिवारी, पर्यवेक्षक संजय नारागुडे आदींनी गुणवंतांचे कौतुक केले.

Web Title: Jagat Jagruti Vidyamandir's resounding success