शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या काळात तरी ‘स्पेशल’ तिकीट कसे परवडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST

सध्याला रेल्वे माेठ्या संख्येने सुरू झाल्या असल्या तरी अजूनही त्या स्पेशल नावानेच धावत आहेत. यातून अधिकचे भाडे आकारले जात ...

सध्याला रेल्वे माेठ्या संख्येने सुरू झाल्या असल्या तरी अजूनही त्या स्पेशल नावानेच धावत आहेत. यातून अधिकचे भाडे आकारले जात आहे. त्याचवेळी जनरल डबे असूनही ‘लाॅक’ आहेत. यातून सर्वसामान्य प्रवाशांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. लातूर रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या मिरज ते परळी वैजनाथ आणि पंढरपूर ते निजामाबाद रेल्वे गत दीड वर्षापासून बंदच आहे. केवळ सात एक्स्प्रेस रेल्वे लातूर येथून सुसाट आहेत. या रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागातील प्रवाशांना या रेल्वेतून प्रवास करणे अशक्य आहे. कारण या रेल्वेला ग्रामीण भागातील रेल्वे स्थानकावर थांबा नाही. लातूर राेड, लातूर, उदगीर येथील रेल्वेस्थानकावरच या एक्स्प्रेस रेल्वे थांबत आहेत.

दुप्पट प्रवासभाडे किती दिवस सहन करणार...

मार्च २०२० पासून पॅसेंजर रेल्वेसेवा बंद आहे. आता टप्प्या-टप्प्याने सुरू झालेल्या रेल्वेगाड्यात सर्वच रेल्वे या एक्स्प्रेस आणि स्पेशल रेल्वेचा समावेश आहे. अशा स्थितीत सामान्य प्रवाशांना प्रवास करणे अशक्य आहे. स्पेशल आणि एक्स्प्रेसचे दुप्पट प्रवासभाडे किती दिवस सहन करणार, असा प्रश्न प्रवाशांतून विचारला जात आहे.

ग्रामीण भागातील सामान्य प्रवाशांच्या साेयीसाठी रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू करण्याची गरज आहे. हा प्रवास खेड्या-पाड्यातील प्रवाशांसाठी साेयीचा आहे.

जनरल डबे कधी ‘अनलाॅक’ हाेणार...

रेल्वे विभागाच्या वतीने लातूर जिल्ह्यातून सुरू करण्यात आलेल्या सात एक्स्प्रेस रेल्वेचे जनरल डबे लाॅकच आहेत. हे डबे अनलाॅक कधी हाेणार, असा प्रश्न सामान्य प्रवाशांतून उपस्थित केला आहे. हे डबे गत दीड वर्षापासून लाॅक आहेत. आता पॅसेंजर रेल्वे सुरू झाल्या तरच खेड्या-पाड्यातील सामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

‘स्पेशल’ भाडे कसे परवडणार?

रेल्वे विभागाने सध्या सुरू केलेल्या रेल्वेगाड्यामध्ये सर्वच एक्स्प्रेस आहेत. परिणामी, एक्स्प्रेसचे प्रवास भाडे सामान्यांना परवडणारे नाही. यासाठी पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू करण्याची गरज आहे. तरच ग्रामीण भागातील प्रवाशांची हेळसांड थांबवणार आहे.

- अंगद मुळे, उदगीर

सणासुदीच्या दिवसांत सुरू असलेल्या एक्स्प्रेस रेल्वेला माेठ्या प्रमाणावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या स्पेशल आणि एक्स्प्रेस रेल्वे सामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. एकतर त्या छाेट्या-छाेट्या रेल्वे स्थानकांवर थांबत नाहीत. या रेल्वेने प्रवास करायचा म्हटल्यावर उदगीर, लातूर राेड आणि लातूर येथील रेल्वे स्थानकांचा वापर करावा लागताे.

- पुंडलिक सूर्यवंशी, लातूर