भरधाव ट्रकची धडक; एकजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:19 IST2021-01-23T04:19:33+5:302021-01-23T04:19:33+5:30

लातूर : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना औसा तालुक्यातील टाका पाटी येथे उजनी ते औसा ...

Hit by a load truck; One seriously injured | भरधाव ट्रकची धडक; एकजण गंभीर जखमी

भरधाव ट्रकची धडक; एकजण गंभीर जखमी

लातूर : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना औसा तालुक्यातील टाका पाटी येथे उजनी ते औसा महामार्गावर १६ जानेवारी रोजी घडली. याबाबत भादा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी विष्णू पांडुरंग चव्हाण (७०, रा. उजनी, ता. औसा) हे टाका पाटी येथे थांबले होते. दरम्यान, भरधाव ट्रकने (एमएच ०४ ईबी ८१२१) त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात डोक्यास गंभीर दुखापत झाली असून, डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाले आहे. सदरचा अपघात उजनी ते औसा या महामार्गावर टाका पाटी येथे शनिवार १६ जानेवारी रोजी घडला. चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगय व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीस धडक दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत भादा पोलीस ठाण्यात विष्णू पांडुरंग चव्हाण यांनी दिलेल्या जबाबावरून ट्रक चालकाविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकाॅ. सूर्यवंशी करीत आहेत.

Web Title: Hit by a load truck; One seriously injured