यशवंत विद्यालयात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST2021-01-04T04:17:43+5:302021-01-04T04:17:43+5:30

हरंगुळ बु. येथील यशवंतराव पाटील विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ...

Greetings at Yashwant Vidyalaya | यशवंत विद्यालयात अभिवादन

यशवंत विद्यालयात अभिवादन

हरंगुळ बु. येथील यशवंतराव पाटील विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

अहमदपूर तालुक्यातील खंडाळी प्रभागातील सुनेगाव शेंद्री येथे उमेद अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या राजमाता ग्रामसंघाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्षा लताबाई काटे, सचिव अर्चना जाधव, कोषाध्यक्ष सारिका जायभाये, धनश्री काळे, ललिता जायभाये, जनाबाई काळे, मनीषा जायभाये, इनुबाई जाधव, सीता जायभाये, सुप्रिया जाधव, चंद्रभागा जायभाये, सागरबाई जायभाये, सुगमता जायभाये, नारायण करांडे आदींची उपस्थिती होती.

अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बब्रुवान मोरे होते. यावेळी डॉ. अनिल मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. तर डॉ. सतीश ससाणे यांनी आभार मानले.

अहमदपूर येथील कस्तुरबा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. बी.डी. उगिले, प्रा. रणजित भोसले, प्रा. सीमा मुंडे, प्रा. रत्नाकर मुंगल, प्रा. सारिका जटाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings at Yashwant Vidyalaya