शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट पशुधनासह पशुधन पालकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST

यावेळी भाऊसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन भगवानराव पाटील, ज्येष्ठ नागरिक किशनराव पाटील, पंचायत समिती उपसभापती शंकरराव पाटील तळेगावकर, पशुधनप्रेमी शंकरराव ...

यावेळी भाऊसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन भगवानराव पाटील, ज्येष्ठ नागरिक किशनराव पाटील, पंचायत समिती उपसभापती शंकरराव पाटील तळेगावकर, पशुधनप्रेमी शंकरराव पाटील, सरपंच सदाशिव पाटील, धनाजी जाधव, मारोती बिरादार, पशुधन जाणकार गोविंद विळेगावे, लिंबाजी घोणसे, गोविंद बिरादार आदी उपस्थित होते.

यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक राम कोनाळे यांच्या बैलजोडीने पटकाविला. द्वितीय तानाजी लादे यांच्या बैलजोडीने पटकाविला. देशी गायीत तानाजी गायकवाड

यांनी बक्षीस पटकाविले. राम जाधव व बाळू जाधव यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस व्यंकट विळेगावे यांच्या बैलजोडीला देण्यात आले. भगवान पाटील यांच्या वतीने फत्तू सय्यद यांच्या देेशी गायीला बक्षीस देण्यात आले. अनिल निडवंचे यांच्याकडून रेेड्यासाठी धोंडिबा जोगी तर वळूसाठी राम विळेगावे यांना बक्षीस देण्यात आले. किशनराव पाटील यांच्याकडून लक्ष्मण दंडे यांच्या गायीस तर गोविंद विळेगावे यांच्याकडून लक्ष्मण कांबळे यांच्या गायीसाठी बक्षीस देण्यात आले. या निवड प्रक्रियेचे कामकाज वाढवणा येथील पशुधन विकास अधिकारी डाॅ. सीताराम केंद्रे, उदगीर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजय अजने यांनी काम पाहिले. आभार पोलीस पाटील संभाजी पाटील यांनी मानले.