शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
4
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
5
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
6
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
7
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
8
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
9
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
10
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
11
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
13
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
14
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
15
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
16
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
17
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
18
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
19
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
20
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

Latur Accident: भरधाव कारच्या धडकेत बाप–लेकाचा जागीच मृत्यू, उमरगा पाटी येथील घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 01:55 IST

लातूरच्या उमरगा पाटी येथे भरधाव कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या बाप–लेकाला जोरदार धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

जळकोट (जि. लातूर): तालुक्यातील उमरगा पाटी येथे रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मुखेडकडून येणाऱ्या एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला दुचाकीसह थांबलेल्या पिता-पुत्राला जोरदार धडक दिली. या अपघातात उमरगा (रेतू) ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अंकुश विश्वनाथ गीते (वय, ५०) आणि त्यांचा तरुण मुलगा ओमकार अंकुश गीते (वय, २४) या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश गीते आणि त्यांचा मुलगा ओमकार हे दोघे आपल्या शेतातील काम आटोपून घराकडे जात होते. उमरगा पाटीजवळ रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून ते थांबले असताना, मुखेडच्या दिशेने येणाऱ्या भरधाव मारुती कारने (क्र. MH 24-2294) त्यांना भीषण धडक दिली. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघात बाप-लेक गंभीर जखमी झाले.

अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी बाप-लेकाला तातडीने हाडोळती येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहमदपूर येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने, अहमदपूर येथील रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. धडक दिल्यानंतर कार खड्ड्यात पडली असली तरी, कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे आतील प्रवासी सुखरूप बचावले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी कारचालकाला जागीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटनेची माहिती मिळताच जळकोट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस उपअधीक्षक अरविंद रायबोले यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मयत अंकुश गीते हे उमरगा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठा होता. कर्तबगार वडील आणि घराचा आधार असलेल्या तरुण मुलाचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Father and Son Die Instantly in Car Collision at Umarga

Web Summary : A speeding car fatally struck a father and son near Umarga Pati, Jalkot, killing them instantly. Ankush Gite, deputy sarpanch, and his son Omkar died while standing by their bike. The car crashed; occupants survived. Driver arrested.
टॅग्स :AccidentअपघातlaturलातूरMaharashtraमहाराष्ट्र