सोयाबीनचा दर घसरल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST2021-09-22T04:23:20+5:302021-09-22T04:23:20+5:30

जगाचा पोशिंदा अशी ओळख शेतक-यांची आहे. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाला शेतकरी तोंड देतात. नुकसान झाले तरी मोठ्या ...

Farmers worried over falling soybean prices | सोयाबीनचा दर घसरल्याने शेतकरी चिंतेत

सोयाबीनचा दर घसरल्याने शेतकरी चिंतेत

जगाचा पोशिंदा अशी ओळख शेतक-यांची आहे. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाला शेतकरी तोंड देतात. नुकसान झाले तरी मोठ्या जिद्दीने उभारी घेतात. मात्र, शेतमालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. मागील वर्षी सोयाबीनचा दर १० हजारापर्यंत गेला होता. मात्र, दरात घसरण झाली आहे. त्यामुळे शासनाने दरात नियमितता ठेवण्याची आवश्यकता आहे. राज्यालगत असणाऱ्या मध्यप्रदेशमध्ये सोयाबीनला १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव आहे. एका राज्यास जास्त भाव व दुसऱ्या राज्यास कमी भाव हा दुजाभाव कशामुळे याचे उत्तर सरकारने द्यावे, महाराष्ट्रातील सरकार शेतकरी, कष्टकरी व कामगार विरोधी असून, आगामी काळात अखिल भारतीय छावा संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन सोयाबीन भाववाढीसाठी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहाणार नसल्याचेही विजयकुमार घाडगे यांनी सांगितले.

Web Title: Farmers worried over falling soybean prices