शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईचे अर्ज करण्यासाठी कृषी कार्यालयात जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:25 IST

खरिपाची पेरणी यावर्षी दोन टप्यामध्ये झाली. पेरणीनंतर काही दिवसांतच पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पिके संकटात सापडली असतानाच अचानक पावसाने ...

खरिपाची पेरणी यावर्षी दोन टप्यामध्ये झाली. पेरणीनंतर काही दिवसांतच पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पिके संकटात सापडली असतानाच अचानक पावसाने सुरूवात केली. यात तालुक्यात अनेक मंडळात अतीवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळावी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. मात्र त्यात अडचण येत असल्यामुळे सरसकट पंचनामे करा असे आदेश दिले होते. याबाबत विमा कंपनीकडून ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल केली नाही अशा शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची गरज आहे. सप्टेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीन,मुग,उडिद,ज्वारी पिकाचे नुकसान झाल्याचे विमा कंपनीस ऑफलाईन पध्दतीने पूर्वसूचना देण्यासाठी १६ सप्टेंबर शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथील तालुका कृषी कार्यालयात यात्रेचे स्वरूप आले होते. या कार्यालयाकडे जाणारा रस्ता शेतकऱ्यांच्या गर्दीने बंद झाला होता.दरम्यान, शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने यांनी केली.

पोलिसांनी सोडली गाडीची हवा...

ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मोटारसायकली रस्त्याच्या बाजूला लावण्यात आल्याने वाहतुकीस मोठा खोळंबा झाला होता. यामुळे पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांच्या गाड्याची हवा सोडल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या गाड्या ओढत आणाव्या लागल्या. तर कोरोणा संसर्गाचा काळ असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी आणखी चार दिवसांची मुदवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी माधव शिंगाडे यांनी केली.