खाद्यतेल महागले; महागाईचा तडका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST2021-01-04T04:17:37+5:302021-01-04T04:17:37+5:30

लातूर शहर आणि जिल्ह्यातील बाजारात भाजीपाल्याची आवक जेमतेम आहे. परिणामी, शेवगा प्रति किलो १६० रुपयांच्या घरात आहे. त्यापाठोपाठ गवार ...

Edible oil became more expensive; The dawn of inflation! | खाद्यतेल महागले; महागाईचा तडका !

खाद्यतेल महागले; महागाईचा तडका !

लातूर शहर आणि जिल्ह्यातील बाजारात भाजीपाल्याची आवक जेमतेम आहे. परिणामी, शेवगा प्रति किलो १६० रुपयांच्या घरात आहे. त्यापाठोपाठ गवार ७० रुपये किलोवर पोहोचले आहे. हिरवी मिरची ३० रुपये, फुलगोबी ६ रुपये, पत्तागोबी १० रुपये, काकडी १५, पांढरी काकडी १० रुपये, भेंडी ३५ रुपये, वांगी, ४० रुपये, कारले ४०, दोडका ४०, भोपळा २५, शेवगा १६०, वरणा ४०, शिमला १०, शेपू, पालक पेंढी प्रत्येकी ५, चुका १० रुपये पेंढी, करडई ५, चंदन बटवा १०, मुळा ४० रुपये गड्डी, मेथी ८ रुपये पेंडी, कोथिंबीर २५ रुपये किलो, कांदा ३५, बटाटा ३०, लसूण १२०, टोमॅटो २५ रुपये किलो दराने विकला जात आहे. यामध्ये गवार आणि शेवग्याच्या शेंगा सर्वाधिक महाग आहेत. सर्वात स्वस्त शेपू, पालक, करडई, फुलगोबी आहे. या आठवड्यात भाजीपाल्याचे दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत.

किराणामध्ये खाद्य तेलापाठोपाठ डाळी शंभरीच्या वर आहेत. तूरडाळ १२० रुपये, मूगडाळ १२०, उडीदडाळ ११० रुपये किलो आहे. तर चनाडाळ ७०, मसूर डाळ ८० रुपये किलो दर आहे. त्यापाठोपाठ रवा ३०, मैदा ३०, पोहे ४०, दाळवं ८०, बेसण आटा ८०, साबुदाणा ६०, भगर ८०, खोबरे १६० रुपये प्रति किलो विकले जात आहे.

गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. अलीकडे भाजीपाला आवक घटली आहे. सर्वाधिक महाग शेवगा आणि गवार आहे. त्यापाठोपाठ मुळा, वांगी, कारले, दोडके, हिरवी मिरची, कांदा यांचा क्रम लागतो. कांद्याचे भाव मात्र ३५ ते ४० च्या खाली उतरायला तयार नाहीत.

Web Title: Edible oil became more expensive; The dawn of inflation!