कमलनगर (जि. बीदर): तालुक्यातील हांदिखेर येथे शनिवारी दुपारी एका ट्रॅक्टरला भीषण आग लागून कडब्यासह संपूर्ण ट्रॅक्टर जळून भस्मसात झाला. रस्त्यावरील लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श कडब्याला झाल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
क्षणार्धात झाले राखरांगोळीहांदिखेर तांडा येथील शेतकरी नामदेव जाधव यांनी चिमेगावहून ७०० कडब्याच्या पेंड्या खरेदी केल्या होत्या. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये कडब्याची उंच गंजी रचून ते गावाकडे येत असताना, गावच्या चौकात लोंबकळणाऱ्या वीज तारांचा स्पर्श कडब्याला झाला. उन्हाचा कडाका आणि वाऱ्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रॅक्टर वेगाने गावाबाहेर नेला, मात्र तोपर्यंत आगीने ट्रॅक्टरचे इंजिन आणि ट्रॉलीला पूर्णपणे कवेत घेतले होते.
शेतकऱ्याचे मोठे नुकसानया आगीत ७०० कडब्याच्या पेंड्या, ट्रॉली आणि ट्रॅक्टरचे हेड (इंजिन) पूर्णपणे जळून खाक झाले आहे. लोंबकळणाऱ्या विद्युत तारांकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या आगीमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाकडून पंचनाम्याची मागणी केली जात आहे.
Web Summary : In Handikher, a tractor carrying 700 fodder bundles was destroyed by fire after contacting low-hanging electrical wires. The driver escaped unharmed. The fire rapidly consumed the tractor and fodder, causing significant financial loss to the farmer. Locals blame negligence for the incident and demand compensation.
Web Summary : हांदिखेर में, नीचे लटकती बिजली के तारों के संपर्क में आने से 700 कडब के गट्ठों से भरा एक ट्रैक्टर आग से नष्ट हो गया। चालक सुरक्षित बच गया। आग ने ट्रैक्टर और चारे को तेजी से भस्म कर दिया, जिससे किसान को भारी नुकसान हुआ। ग्रामीणों ने लापरवाही को दोषी ठहराया और मुआवजे की मांग की।