शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
3
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
4
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
5
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
7
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
8
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
9
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
10
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
11
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
12
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
13
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
14
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
15
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
16
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
17
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
18
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
19
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
20
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात होणार घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

जळकोट तालुक्यातील सोयाबीनवर सद्य:स्थितीत करप्या, मावा, खोड अळी, शेंडी अळी, हळद्या, आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगाचा प्रादुर्भाव ...

जळकोट तालुक्यातील सोयाबीनवर सद्य:स्थितीत करप्या, मावा, खोड अळी, शेंडी अळी, हळद्या, आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ५० टक्के घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. तालुक्यात एकूण २५ हजार हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य असून, त्यापैकी ८ ते १० हजार हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी आपले नगदी पीक म्हणून सोयाबीनचा पेरा केला आहे. मात्र, सारखा पाऊस व त्या पाठपोठ विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पिके पूर्णतः धोक्यात आले आहेत. त्याचबरोबर मुगाचे पीक व उडिदाचे पिके १०० टक्के हातातून गेले आहे. नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे होण्याच्या आधीच या रोगाने घाला घातल्याने बळिराजा अडचणीत आला आहे.

शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात यावे, वीज बिलाची वसुली थांबवावी, बँकेची वसुली थांबवावी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई अनुदान द्यावे, मोफत शिक्षण करण्यात यावे, अशी मागणी या तालुक्यातील ४७ गावच्या शेतकऱ्यांनी केली आहे.

रबी हंगामाकडे शेतकऱ्यांच्या आशा...

जळकोट तालुक्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच पावसामुळे तालुक्यातील लघू, मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामास मदत होणार आहे. खरिपाचे पीक हातचे गेले असून, रबी हंगामात तरी चांगले उत्पन्न मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.