आंब्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:11+5:302021-04-14T04:18:11+5:30

... १७ बसेस धावल्या अहमदपूर : वीकेंड लॉकडाऊनमध्ये रविवारी येथील स्थानकातून केवळ १७ बसेस धावल्याची माहिती आगारप्रमुख शंकर सोनवणे ...

Damage to mango | आंब्याचे नुकसान

आंब्याचे नुकसान

Next

...

१७ बसेस धावल्या

अहमदपूर : वीकेंड लॉकडाऊनमध्ये रविवारी येथील स्थानकातून केवळ १७ बसेस धावल्याची माहिती आगारप्रमुख शंकर सोनवणे यांनी दिली. नांदेड-लातूर, नांदेड-बिदर, नांदेड-सोलापूर, सोलापूर-नांदेड, लातूर-आर्वी, लातूर-नांदेड, बिदर-नांदेड, लातूर-किनवट बसेस धावल्या.

...

निर्जंतुकीकरण मोहीम

अहमदपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येथील बसस्थानकात पाण्याचे टँकर मागवून सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आल्याची माहिती आगारप्रमुखांकडून देण्यात आली. प्रवाशांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही केले.

...

अवकाळी पाऊस

निटूर : निलंगा तालुक्यातील निटूर व केळगाव परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. वाऱ्यामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

...

पथदिवे बंद

लातूर : शहरातील ५ नंबर चौक ते बार्शी रोड असलेल्या समांतर रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Damage to mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.