शिरोळ जानापूर येथे कोविड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:09+5:302021-04-14T04:18:09+5:30

... दापका येथे कोविड लसीकरण मोहीम लातूर : शिवणी कोतल येथील श्री शामगीर शिक्षण संस्था संचलित दापका येथील जय ...

Covid vaccination at Shirol Janapur | शिरोळ जानापूर येथे कोविड लसीकरण

शिरोळ जानापूर येथे कोविड लसीकरण

Next

...

दापका येथे कोविड लसीकरण मोहीम

लातूर : शिवणी कोतल येथील श्री शामगीर शिक्षण संस्था संचलित दापका येथील जय भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी १०० जणांना ही लस देण्यात आली. यशस्वीतेसाठी वसंतराव पाटील, प्राचार्य राजेश्वर पाटील, उपप्राचार्य सुधाकर बिराजदार यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. ४५ वर्षांपुढील नागरिकांनी ही लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

...

उन्हाळी सोयाबीन पीक जोमात

औराद शहाजानी : कर्नाटक सीमेवरील व मांजरा नदीकाठावरील हालसी तुगाव येथील शेतकरी हणमंत नेकनाळे यांनी पाण्याचा योग्य वापर करीत चार एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. हे पीक जोमात आले आहे. त्याची पाहणी कृषी मंडळ अधिकारी एच. एम. पाटील, कृषी सहायक एस. एस. माळी, एन. एन. वाघमारे, एस. डी. नेकनाळे आदींनी केली.

...

प्रहार जनशक्तीच्या शहराध्यक्षपदी शेख

उदगीर : प्रहार जनशक्ती पक्षाच्या शहराध्यक्षपदी रियाज मैनोद्दीन शेख यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांचे स्वागत राज्य संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले, रविकिरण बेळकुंदे, माधव मोतीपवळे, जोहेब शेख आदींनी केले.

...

विजेचा लपंडाव, नागरिक झाले त्रस्त

पानगाव : पानगाव येथे सातत्याने वीज गूल होत असल्याने गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महावितरणने सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, उन्हाची तीव्रता वाढल्याने उकाडा अधिक जाणवत आहे. त्यामुळे घरी बसणे कठीण होत आहे. त्यामुळे त्रास होत आहे.

Web Title: Covid vaccination at Shirol Janapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.