CoronaVirus : उदगीरच्या रुग्णाचे दिल्ली कनेक्शन नाही; कोरोना लक्षणेही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 16:39 IST2020-04-01T16:38:11+5:302020-04-01T16:39:57+5:30

१५ दिवसांपूर्वीच दिल्ली येथून घरी आला

CoronaVirus: Udagir's patient has no Delhi connection; Neither have corona symptoms | CoronaVirus : उदगीरच्या रुग्णाचे दिल्ली कनेक्शन नाही; कोरोना लक्षणेही नाहीत

CoronaVirus : उदगीरच्या रुग्णाचे दिल्ली कनेक्शन नाही; कोरोना लक्षणेही नाहीत

ठळक मुद्देलातूर जिह्यात एकही दिल्ली कनेक्शन रुग्ण नाहीउडगिरच्या तरुणाचा दिल्लीतील कार्यक्रमात सहभाग नव्हता

उदगीर : उदगीर मधील रुग्णास खबरदारी म्हणून बुधवारी दाखल करून आरोग्य तपासणी केली. त्याच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणे नाहीत. त्या रुग्णाचे दिल्ली कनेक्शन अजिबात नाही. आपल्या जिल्ह्यात दिल्ली संदर्भाने कोणीही नाही, असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ राजेंद्र माने तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय ढगे यांनी सांगितले.

डॉ ढगे म्हणाले, सदर व्यक्ती १५ दिवसापूर्वी दिल्ली येथून प्रवास करून आला, मात्र त्याचा तेथील कार्यक्रमात सहभाग नव्हता. त्यास जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दुजोरा दिला. आपल्या जिल्ह्यात एकही दिल्ली कनेक्शन संबंधाने रुग्ण नाही. मात्र आपण प्रत्येक शक्यता पडताळून पाहत आहोत. कोणतीही उणीव राहू नये म्हणून अधिकाधिक तपासणी व प्रत्येकाच्या शंकांचे निरसन करत आहोत. मात्र चुकीची माहिती देऊन प्रशासन व यंत्रणेची धावपळ करू नये असे आवाहन करण्यात आले. दरम्यान पुढील काही दिवस घराबाहेर पडू नका, सहकार्य करावे असेही कळविण्यात आले आहे.

Web Title: CoronaVirus: Udagir's patient has no Delhi connection; Neither have corona symptoms