coronavirus : लातुरात कोरोनाचे दोन बळी; ६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 21:34 IST2020-06-10T21:33:58+5:302020-06-10T21:34:40+5:30

लातूर शहर आणि औसा येथील बाधितांचा मृत्यू

coronavirus: two deaths of coronavirus in Latur; 6 Positive | coronavirus : लातुरात कोरोनाचे दोन बळी; ६ पॉझिटिव्ह

coronavirus : लातुरात कोरोनाचे दोन बळी; ६ पॉझिटिव्ह

लातूर : औसा शहरातील कादरी नगरातील एका ६९ वर्षीय तर लातुरातील मोती नगरातील एका ७५ वर्षीय कोरोना बाधिताचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दोघांनाही मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तसेच एकास किडनीचा आजार होता.

दरम्यान, आणखी ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ७ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर व विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६ वर पोहोचली आहे़ दरम्यान, बुधवारी तपासलेल्या ५६ स्वॅबपैकी ६ पॉझिटिव्ह तर ४१ निगेटिव्ह व ७ प्रलंबित आहेत. तसेच दोघांचा अहवाल अनिर्णित आहे.

Web Title: coronavirus: two deaths of coronavirus in Latur; 6 Positive