शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

CoronaVirus : लातूर पोलिसांचा दणका; अधिकारी,पुढारी,पत्रकारासह २३ जणांवर गुन्हे नोंदवून वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 3:28 PM

संचारबंदीत मॉर्निंग वॉकचा उत्साह अंगलट

ठळक मुद्दे15 एप्रिलपर्यंत कायद्याचे कठोर पालन करण्याचे पोलिसांचे आवाहनविनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई

लातूर: संचारबंदीचा आदेश लागू असताना मॉर्निंग वॉकला जाण्याचे प्रमाण अद्याप कायम आहे. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी एमआयडीसी, रिंग रोड, बार्शी रोडवर मॉर्निंग वॉकला गेलेल्या तेरा लोकांवर कारवाई केली. शिवाय, त्यांच्याकडील वाहने जप्त केले आहेत. सदर व्यक्तींवर एमआडीसी पोलीस ठाण्यात कलम १४४ नुसा कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये जिल्हा परिषदेच्या एका माजी समाजकल्याण सभापतीचा समावेश असून एक महसूल विभागात मंडळ अधिकारी पदावर कार्यरत आहे. तसेच या कारवाईत एका पत्रकाराचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला नसला तरी प्रशासनाने या महाभयंकर आजार आजाराला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या आहेत. सामाजिक अंतर ठेवणे तसेच जीवनावश्यक वस्तूंची विक्री दोन वाजेपर्यंत करणे याबरोबरच अन्य योजना आहेत. या सर्व नियमांचे पालन शहरातील नागरिक करत आहेत. परंतु परंतु काही लोक नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही जणांवर ही कारवाई केली आहे. त्यांचे वाहने जप्त केली आहेत. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीच बाहेर पडावे. तेही निर्धारित वेळेतच. विनाकारण बाहेर येऊ नये आणि स्व:ताला धोक्यात घालू नये असे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे. शहराच्या बार्शी रोड, एमआयडीसी परिसर, नांदेड नाका, औसा रोड परिसरात तसेच जुन्या जिल्हाधिकार कार्यालय आणि जिल्ह परिषदेच्या प्रांगणांत साडेपाच ते साडेसात या वेळेत फिरायला येणा-यांची संख्या असते. त्यांना रोखण्यासठी गुड मॉर्निंग पथक तैनात करण्यात आले आहे. रस्त्यावर वॉकिंग साठी आलेल्या नागरिकांवर या पथकामार्फत कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे १५ एप्रिल पर्यंत या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिका-यांनी दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूरCrime Newsगुन्हेगारी