शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

CoronaVirus: खोकला, ताप आल्याने अमित देशमुख यांची कोरोना चाचणी; अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 7:10 PM

खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर प्रत्येकाने स्वत:हून तपासणी करून घेतली पाहिजे, असे वैद्यकीय निर्देश आहेत.

ठळक मुद्देघाबरू नका, तपासणी करून घ्या...

लातूर : खोकला व ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी कोरोना चाचणी करून घेतली. दरम्यान, बुधवारी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर प्रत्येकाने स्वत:हून तपासणी करून घेतली पाहिजे, असे वैद्यकीय निर्देश आहेत. त्यानुसार खोकला व ताप आल्यामुळे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना चाचणी करून घेतली. बुधवारी त्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असून काळजीचे कारण नाही. 

या संदर्भात पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले, आपल्याला ताप व खोकला आजाराची लक्षणे असताना इतरांना प्रादुर्भाव होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी चाचणी करून घेतली. राज्य शासनाकडून कोविड-१९ संदर्भात देण्यात आलेल्या सूचनांचे सर्वांनीच पालन तसेच हेल्पलाईनला संपर्क केला पाहिजे, असे ते म्हणाले.

घाबरू नका, तपासणी करून घ्या...सर्दी, खोकला, ताप असेल तर घाबरून जाऊ नका. आपला आजार, लक्षणे लपवू नका.  आपल्यामुळे आई, वडील, कुटुंब, शेजारी व समाजात संसर्ग होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे असे स्पष्ट करीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, चार दिवस घरून काम करीन. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कार्यालयातून काम पाहता येईल. दरम्यान, आ. धीरज देशमुख यांनी पालकमंत्र्यांची प्रकृती उत्तम असून, काळजीचे कारण नाही. प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी म्हणून लक्षणे दिसल्यास तपासणी करून घेतली पाहिजे, असे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर