पाच दिवसीय योग शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST2021-06-10T04:14:54+5:302021-06-10T04:14:54+5:30

अहमदपूर : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाच्या दिनचर्येत योग, प्राणायाम आणि ...

Concluding the five-day yoga camp | पाच दिवसीय योग शिबिराचा समारोप

पाच दिवसीय योग शिबिराचा समारोप

अहमदपूर : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाच्या दिनचर्येत योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा आवश्यक असते. त्यामुळे महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांच्या मार्गदर्शनानुसार ऑनलाईन पद्धतीने पाच दिवसीय योग शिबिर घेण्यात आले.

आर्ट ऑफ लिव्हिंग आणि महात्मा फुले महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते ९ जून या कालावधीत शिबिर पार पडले. दररोज सकाळी ९ ते १० यावेळेत हे शिबिर घेण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे ज्येष्ठ प्रशिक्षक प्रा. रामेश्वर वायाळ, प्रा. औदुंबर मुळे, डॉ. बब्रुवान मोरे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता सौंदळे यांनी शिबिरात मार्गदर्शन केले.

या पाच दिवसीय शिबिरात परिसरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व पालकांनी सहभाग घेतला. शिबिराच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, मुख्य संयोजक डॉ. बब्रुवान मोरे, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रा. डॉ. सतीश ससाणे, डॉ. नागराज मुळे, डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब, डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. डी. एन. माने, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. अभिजीत मोरे, डॉ. आतिश आकडे, डॉ. सचिन गर्जे, प्रा. परमेश्वर इंगळे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Concluding the five-day yoga camp