शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपूरवर आता सीसीटीव्हीची नजर, १९ ठिकाणी बसवले जाणार कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदपूर : शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढला असून, गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदपूर : शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढला असून, गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी नागरी दलित वस्ती व दलित्तेर विकास योजनेच्या निधीतून जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील १९ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी २५ लाख ५४ हजार ५८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरावर आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.

अहमदपूर शहराचा विस्तार वाढला असून, मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाणही वाढले होते. तसेच वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना अडचण येत होती. त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी नागरी दलित व दलित्तेर विकास योजनेच्या निधीतून पालिकेकडे निधी वर्ग केला. शहरातील उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक व पालिकेच्या सूचनेवरून १९ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे निश्चित झाले आहे. शहरातील चौकात वेगवेगळ्या अँगलचे कॅमेरे बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, जाधव पेट्रोल पंप, महात्मा गांधी महाविद्यालयासमोर, संभाजी चौक, निजवंते चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, शासकीय विश्रामगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक, फुलारी यांचे दुकान, क्रांती चौक, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, खाटीक गल्ली, पंचशील नगर, ईदगाह गेट, मौलाना आझाद चौक अशा १९ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी गुगल मॅप लोकेशनही निश्चित करण्यात आले आहे.

चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असून, शहरातील वाहतूक व रहदारीवर नियंत्रण केले जाणार आहे. त्यासाठीचे सर्व्हर पोलीस ठाण्यात बसविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया येत्या काही महिन्यांत पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण घटणार आहे.

गुन्हेगारी, रहदारीवर नियंत्रण...

शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार असल्यामुळे गुन्हेगारी तसेच रहदारीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. तेथील सर्व फुटेज उपलब्ध होणार असल्याने तपास यंत्रणेलाही याकामी मदत होणार असल्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून मंजुरी...

शहराचा विस्तार वाढल्यामुळे व लोकसंख्या वाढल्यामुळे रहदारीसह अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने नागरी दलित वस्ती व दलित्तेर विकास योजनेच्या निधी अंतर्गत २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात सीसीटीव्ही व त्यासाठी असणाऱ्या संलग्न यंत्रणेची निविदा काढण्यात येणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.