जिल्हा परिषदेत सुंदर माझे कार्यालय अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:59 IST2021-01-08T04:59:09+5:302021-01-08T04:59:09+5:30

रद्दीतून १ लाख ६६ हजार जिल्हा परिषदेत अभिलेख वर्गीकरणात जवळपास १८ टन ५ क्विंटल संचिका निर्लेखित केल्या आहेत. या ...

Beautiful my office campaign in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत सुंदर माझे कार्यालय अभियान

जिल्हा परिषदेत सुंदर माझे कार्यालय अभियान

रद्दीतून १ लाख ६६ हजार

जिल्हा परिषदेत अभिलेख वर्गीकरणात जवळपास १८ टन ५ क्विंटल संचिका निर्लेखित केल्या आहेत. या रद्दीतून जिल्हा परिषदेला १ लाख ६६ हजार रूपये मिळाले आहेत. तालुकास्तरावर अभिलेख अद्ययावत करण्याचे काम केले जात आहे. लातूर पंचायत समितीत जवळपास ३० क्विंटल रद्दी मार्गी लावण्यात आली असल्याचे सीईओ गोयल यांनी सांगितले.

अंगणवाडी अद्ययावत होतेय...

जिल्ह्यात २ हजार ४०८ अंगणवाडी असून त्या अद्ययावत करण्यासाठी लोकसहभाग घेतला जात आहे. हॅप्पी होम आपल्या गावची नव्या पिढीची अंगणवाडी या अंतर्गत मूल्यांकन करून रंगरंगोटी करीत गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यातील १ हजार १०० अंगणवाड्या अ दर्जामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. जिथे सुविधा नाहीत, तिथे पुरविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Beautiful my office campaign in Zilla Parishad