शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपुरातील ३० प्रकल्पांत ९१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST

अहमदपूर : महिनाभराच्या कालावधीत उघडीप दिलेल्या पावसाने अहमदपूर परिसरात दमदार हजेरी लावल्यानेे तालुक्यातील ३० पैकी १९ प्रकल्प १०० टक्के ...

अहमदपूर : महिनाभराच्या कालावधीत उघडीप दिलेल्या पावसाने अहमदपूर परिसरात दमदार हजेरी लावल्यानेे तालुक्यातील ३० पैकी १९ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तालुक्यातील प्रकल्पांत ९१ टक्के पाणीसाठा झाला असून, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामास मदत होणार आहे.

अहमदपूर तालुक्यात मोघा लघुसाठवण, थोडगा, सावरगाव थोट तलाव, तांबट सांगवी, मावलगाव, खंडाळी, हागदळ, गुगदळ, नागझरी साठवण तलाव; तर सोनखेड, धसवाडी, अंधोरी, ढाळेगाव, हंगेवाडी, येलदरी, कोपरा, भुतेकरवाडी, गौताळाल, काळेगाव, अहमदपूर. वाकी, येस्तार, मोळवण, कावळवाडी, नागठाणा, उगीलेवाडी, पाटोदा, तेलगाव, कौडगाव असे लघू, मध्यम व साठवण असे ३० प्रकल्प आहेत. तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने परिसरातील मोघा, सावरगाव थोट, तांबट सांगवी, मावलगाव, हगदळ, गुगदळ, नागझरी, सोनखेड, ढाळेगाव, येस्तार, कावळवाडी, हांगेवाडी, यलदरी, कोपरा, नागठाणा, उगिलेवाडी, पाटोदा, कौडगाव, केंद्रेवाडी, अहमदपूर प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. मात्र यंदा पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षेतच ठेवले होते. पावसाने ओढ दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांच्या काळजीत भर पाडली होती. पावसाच्या पाण्याची ओढ बसल्यामुळे पिके हातची जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पावसाने पुनरागमन केल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे. हा पाऊस जनावरांच्या चाऱ्यालाही फायदेशीर आहे; यामुळे दूध व्यावसायिकही सुखावले आहेत. तालुक्यातील प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बीच्या क्षेत्रातदेखील वाढ होणार आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाने अहमदपूर तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने नदी-नाल्यांना पूर आल्याने तालुक्यातील ३० लघू, मध्यम प्रकल्प व साठवण तलावांत सरासरी ९१ टक्के जलसाठा असून, ११ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा ५० टक्क्यांवर आहे. झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामासाठी मदत होणार आहे.

पावसामुळे पशुपालकांनाही मिळाला दिलासा

तालुक्यात पशुुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पावसामुळे पशुधनाला हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. सोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. दरम्यान, पावसामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांना प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने सिंचनासाठी मदत होणार आहे.

रब्बी हंगामासाठी होणार फायदा

तालुक्यातील बरेच तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामातील रब्बी पिकांचे, उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तलाव भरल्यामुळे विहिरींची, बोअरवेलची पाणीपातळी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.

- प्रवीण लांजे, शेतकरी