२१७ जागांसाठी ५०८ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:59 IST2021-01-08T04:59:40+5:302021-01-08T04:59:40+5:30

उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कुठे दुरंगी, तर कुठे तिरंगी, चौरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील एकमेव ...

508 candidates in fray for 217 seats | २१७ जागांसाठी ५०८ उमेदवार रिंगणात

२१७ जागांसाठी ५०८ उमेदवार रिंगणात

उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कुठे दुरंगी, तर कुठे तिरंगी, चौरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील एकमेव तिरुका ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. एकुर्गा खुर्द येथील ७, डोंगरकोनाळी १ व अन्य ठिकाणच्या अशा एकूण १६ सदस्यांच्या जागा बिनविरोध निघाल्या असल्याची माहिती तहसीलच्या निवडणूक विभागाने दिली.

तालुक्यातील गावनिहाय उमेदवारांची संख्या : एकुर्गा- ९, अतनूर- २६, मेवापूर- १४, गव्हाण- १८, चिंचोली- १३, मरसांगवी- २६, सुल्लाळी- १९, डोंगरगाव- १४, शिवाजीनगर तांडा- १३, घोणसी- ३५, बोरगाव खुर्द- २१, वांजरवाडा- ४४, शेलदरा- १५, वडगाव- १३, येलदरा- १४, कोळनूर- १८, पाटोदा खुर्द- १६, रावणकोळा- २७, हळद वाढवणा- ११, सोनवळा- ३१, डोंगर कोनाळी- १४, लाळी बु.- १७, बेळसांगवी- २१, धामणगाव- १८, कुणकी- १८, विराळ- १४ असे एकूण ५०८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मंगळवारपासून तालुक्यातील गावा- गावांत प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.

Web Title: 508 candidates in fray for 217 seats