१ हजार ४७० व्यक्तींच्या चाचण्यांत १४ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:26+5:302021-09-21T04:22:26+5:30

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत सोमवारी ९५० व्यक्तींची चाचणी करण्यात आली, त्यात ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

14 obstructed in tests of 1,470 persons | १ हजार ४७० व्यक्तींच्या चाचण्यांत १४ बाधित

१ हजार ४७० व्यक्तींच्या चाचण्यांत १४ बाधित

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत सोमवारी ९५० व्यक्तींची चाचणी करण्यात आली, त्यात ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच ५२० व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली, त्यात ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही मिळून १ हजार ४७० व्यक्तींची चाचणी करण्यात आली, त्यात १४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात ७४ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२८ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ३ हजार ७१५ दिवसांवर पोहोचला आहे, तर मृत्यू दर २.६ टक्क्यांवर आहे. दरम्यान, सोमवारी प्रकृती ठणठणीत बनल्याने १४ रुग्णांना रुग्णालय प्रशासनाच्यावतीने सुटी देण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले.

Web Title: 14 obstructed in tests of 1,470 persons