जिल्हा परिषद अध्यक्षांची ‘हार्ले डेव्हिडसन’वरून एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:29 IST2021-08-12T04:29:18+5:302021-08-12T04:29:18+5:30

पाटील हे सकाळी ११ च्या सुमारास आपली आवडती ही बाईक घेऊन दिंडनेर्ली येथील राजीव गांधी सूतगिरणीकडे निघाले होते. याचवेळी ...

Zilla Parishad President's entry from 'Harley Davidson' | जिल्हा परिषद अध्यक्षांची ‘हार्ले डेव्हिडसन’वरून एन्ट्री

जिल्हा परिषद अध्यक्षांची ‘हार्ले डेव्हिडसन’वरून एन्ट्री

पाटील हे सकाळी ११ च्या सुमारास आपली आवडती ही बाईक घेऊन दिंडनेर्ली येथील राजीव गांधी सूतगिरणीकडे निघाले होते. याचवेळी त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते जिल्हा परिषदेत आल्याचा त्यांना निरोप आला. अर्ध्या तासात त्यांना भेटून जायचे म्हणून पाटील यांनी बाईकवरूनच थेट जिल्हा परिषदेत एन्ट्री केली.

पिवळया रंगाच्या या बाईकवरून हेल्मेट, गॉगल घातलेला आणि मास्क लावलेला हा युवक कोण हे सुरक्षा रक्षकाच्याही लक्षात आले नाही. त्यांनी येऊन पोर्चमध्ये गाडी लावून हेल्मेट काढल्यानंतर मग ते अध्यक्ष पाटील असल्याचे साऱ्यांना समजले. पाटील अर्ध्या तासासाठी आले आणि दुपारी चारपर्यंत थांबले. त्यामुळे अध्यक्षांच्या गाडीच्या पार्किंगच्या ठिकाणी ही ९२९२ क्रमांकाची त्यांची उभी असलेली बाईक अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. पाटील हे परत जातानाही त्यांच्या गाडीसोबत फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

१००८२०२१ कोल राहुल पाटील झेडपी

Web Title: Zilla Parishad President's entry from 'Harley Davidson'