शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेने मागवली सौर पंपांची माहिती, ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 11:56 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील १0 तालुक्यांमध्ये बसविण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांवरील ४२ सौर पंपांची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने मागवली आहे. याबाबत ‘लोकमत’ने ‘बंद पंपातून’ ‘आॅनलाईन उपसा’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेने मागवली सौर पंपांची माहिती‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते वृत्त

कोल्हापूर : जिल्ह्यातील १0 तालुक्यांमध्ये बसविण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांवरील ४२ सौर पंपांची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने मागवली आहे. याबाबत ‘लोकमत’ने ‘बंद पंपातून’ ‘आॅनलाईन उपसा’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते.जिल्ह्यातील आजरा आणि गडहिंग्लज तालुके वगळून १0 तालुक्यांमध्ये ४२ गावांतील पाणी योजनांवर महाऊर्जाकडून सौर पंप बसविण्यात आले आहेत. तीन आणि पाच अश्वशक्तीचे हे पंप असून, या माध्यमातून ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे; मात्र यातील काही पंप बसविताना अडचणी आल्या आहेत, काही पंपांची जागा बदलण्यात आली आहे, असे प्रकार निदर्शनास आले आहेत.पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ आळते येथे तर पंप बसविलेला नसताना आॅनलाईन यंत्रणेद्वारे मात्र पाणी उपसा सुरू असल्याचा अहवाल अधिकाऱ्यांना आला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर खळबळ उडाली.

महाऊर्जानेही या ४२ गावांमधील सौर पंपांची नेमकी अवस्था काय आहे, हे जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेला पत्र दिले. यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी गटविकास अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता यांना पत्र पाठवले असून, या ४२ गावांतील सौरपंपांच्या सध्यस्थितीचा अहवाल मागविला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सौर पंप आस्थापित होत असताना त्याची पाहणी महाऊर्जामार्फत करण्यात आली आहे; परंतु ज्या ठिकाणी काही तांत्रिक कारणांमुळे पुरवठादाराकडून सौर पंप बसविण्यात आले नव्हते; पण तांत्रिक बाबी दूर झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या साहाय्याने आस्थापित केले जाणार होते, याची माहिती संबंधित ग्रामपंचायतींकडून या कार्यालयास वेळीच दिली गेली नाही. यातील त्रुटी लक्षात आल्यानंतर पुन्हा जिल्ह्यातील सर्व सौर पंपांची फेरपाहणी करून सुदूर सनियंत्रण प्रणालीची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करण्याची मोहीम हाती घेण्याचा या कार्यालयाचा प्रयत्न आहे.एस. ए. पाटीलविभागीय व्यवस्थापक, महाऊर्जा, कोल्हापूर

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर