जिल्हा परिषदेत महिला, अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:28 IST2021-03-09T04:28:10+5:302021-03-09T04:28:10+5:30

कोल्हापूर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार ...

Zilla Parishad felicitates women and officers | जिल्हा परिषदेत महिला, अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

जिल्हा परिषदेत महिला, अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रत्येक विभागांतील अधिकारी आणि प्रमुख कर्मचारी यांचा हा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी विभागातील उपसंचालक भाग्यश्री पवार यांचे ‘जीवनातील सकारात्मकता’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, प्रियदर्शिनी मोरे, शिक्षणाधिकारी आशा उबाळे यावेळी उपस्थित होत्या. महिला आणि बालविकास विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चौकट

समिती कुठे आहे

महिला आणि बालकल्याण विभागाच्यावतीने जरी हा कार्यक्रम असला तरी देखील या समितीच्या सभापती डॉ. पद्मराणी पाटील आणि सदस्य कार्यक्रमाला अनुपस्थित होते. याबाबत विचारणा केली असता या समितीचे सर्व सदस्य अभ्यास दौऱ्यासाठी राजस्थानला गेल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Zilla Parishad felicitates women and officers