युवकास लोखंडी रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:20 IST2021-02-08T04:20:58+5:302021-02-08T04:20:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून तिघांनी एकाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार अंबाई टँक परिसरत ...

The youth was beaten with an iron rod | युवकास लोखंडी रॉडने मारहाण

युवकास लोखंडी रॉडने मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून तिघांनी एकाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार अंबाई टँक परिसरत घडला. यामध्ये प्रीतम मधुकर कदम (वय २७, रा. अंबाई टँक परिसर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी अनिकेत शिंदे (रा. अंबाई टँक परिसर) याच्यासह त्याचे दोन-तीन साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे.

महिलेस डंपरने ठोकरले

कोल्हापूर : भरधाव डंपर हयगयीने चालवून पादचारी महिलेस धडक दिल्याने महिला जखमी झाली. हा प्रकार कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर सांगरूळ फाटा येथे घडला. लता युवराज पाटील (वय ३५, रा. कोपार्डे, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. या अपघातप्रकरणी करवीर पोलिसांनी अज्ञात डंपरचालकावर गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: The youth was beaten with an iron rod