उदगावच्या तरुणांनी वाचविले वृद्धेचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST2021-04-18T04:23:01+5:302021-04-18T04:23:01+5:30

उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीकाठावरील स्मशानभूमीजवळ एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिथे ...

The youth of Udgaon saved the life of the old man | उदगावच्या तरुणांनी वाचविले वृद्धेचे प्राण

उदगावच्या तरुणांनी वाचविले वृद्धेचे प्राण

उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीकाठावरील स्मशानभूमीजवळ एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित असणारे उदगावमधील तरुण चेतन कोरे व पिंटू आवळे यांनी त्या वृद्धेला समुपदेशन करीत तिचे प्राण वाचविले. ह्या तरुणांच्या कृतीने ग्रामस्थांतून त्यांचे कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ही वृद्ध महिला स्मशानभूमीजवळील जॅकवेलजवळ चेतन कोरे व पिंटू आवळे यांना दिसून आली, त्यांनी महिलेला तुम्ही इथे धुणे धुवायला आला आहात का? अशी विचारणा केली असता मी जीव द्यायला आलो आहे असे सांगितले. यावर ह्या दोघांनी समयसूचकता दाखवीत त्या महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवत गावातील वाहिद सुतार व सागर कदम यांना संपर्क केला. तद्नंतर तातडीने जयसिंगपूर पोलीस ठाण्याशी संपर्क केला. यावेळी पोलीस अभिजित भातमारे, पोलीसपाटील अनुराधा कांबळे उपस्थित होते.

-

-

अशा प्रकारच्या आत्महत्येचे प्रयत्न याआधीही तीन-चार वेळा घडले आहेत. स्मशानभूमी परिसरात लाईटची अपुरी व्यवस्था असल्याने रात्रीच्या वेळी असे प्रकार नजरेस येत नाहीत. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला लाईटची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

चेतन कोरे, उदगाव

Web Title: The youth of Udgaon saved the life of the old man