आपचा ‘झाडू’ शहरात फिरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:41 IST2021-02-06T04:41:57+5:302021-02-06T04:41:57+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने इतर पक्षांच्या तुलनेत एक पाऊल पुढे टाकत गुरुवारी ‘रिक्षा प्रचारा’ला सुरुवात केली. ...

Your 'broom' will move around the city | आपचा ‘झाडू’ शहरात फिरणार

आपचा ‘झाडू’ शहरात फिरणार

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने इतर पक्षांच्या तुलनेत एक पाऊल पुढे टाकत गुरुवारी ‘रिक्षा प्रचारा’ला सुरुवात केली. बिंदू चौकातून स्वच्छता मोहीम राबवून ‘आप’ने प्रचार सुरु केला. रिक्षावर पक्षाचे चिन्ह असलेली झाडू लावली असून, ही झाडू आता शहरभर फिरणार आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘आप’कडून शहरातील मतदारांसोबत ‘मिसळ पे चर्चा’ हा संवाद कार्यक्रम गेला महिनाभर सुरू आहे. तसेच बाजारपेठांमध्ये फिरून छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांकडून देणगी स्वीकारत ‘लोकवर्गणीतून महानगरपालिका निवडणूक’ यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. आता प्रचारासाठी रिक्षा शहरात फिरणार आहेत. यावेळी प्रचार प्रमुख संदीप देसाई यांच्यासह उत्तम पाटील, अमरजा पाटील, संतोष घाटगे, सुरज सुर्वे, आदम शेख, राज कोरगावकर, वैशाली कदम, आदी उपस्थित होते.

फोटो : ०४०२२०२१ कोल आम आदमी पार्टी न्यूज

ओळी : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने गुरुवारी बिंदू चौक येथून प्रचाराला सुरुवात केली.

Web Title: Your 'broom' will move around the city