वडणगे घरफोडीप्रकरणी इस्लामपुरातील तरुण अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:23 IST2021-03-08T04:23:48+5:302021-03-08T04:23:48+5:30

कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील सुमारे ८१ हजारांच्या घरफोडीप्रकरणी करवीर पोलिसांनी संशयितास तरुणास अटक केली. कुणाल संजय शिर्के ...

Young man arrested in Islampur for burglary | वडणगे घरफोडीप्रकरणी इस्लामपुरातील तरुण अटक

वडणगे घरफोडीप्रकरणी इस्लामपुरातील तरुण अटक

कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील सुमारे ८१ हजारांच्या घरफोडीप्रकरणी करवीर पोलिसांनी संशयितास तरुणास अटक केली. कुणाल संजय शिर्के (वय २६ रा. इस्लामपूर) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडणगे येथील इंदिरानगरातील प्रशांती तानाजी पाटील ह्या आपल्या पतीसोबत सासरी वरणगे पाडळी (ता. करवीर) येथे गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील रोख ५८ हजार रुपये, १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, तीन हजारांचे मणी मंगळसूत्र, २७५० रुपयांच्या सोन्याच्या रिंगा असा सुमारे ८१ हजार ७५० रुपयेचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना दि. ८ ते ९ नोव्हेंबर २०२० या दरम्यान घडली. याप्रकरणी पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयावरून कुणाल संजय शिर्के यांना अटक केली.

Web Title: Young man arrested in Islampur for burglary