Kolhapur: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण-तरुणी ठार, महाडजवळ झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:40 IST2026-01-05T19:39:19+5:302026-01-05T19:40:28+5:30
कसबा तारळे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील नडगाव येथे अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण-तरुणी जागीच ठार ...

Kolhapur: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण-तरुणी ठार, महाडजवळ झाला अपघात
कसबा तारळे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील नडगाव येथे अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण-तरुणी जागीच ठार झाले. राहुल वसंत पाटील (वय २८ रा. कळंकवाडी ता.राधानगरी, जि. कोल्हापूर) आणि अनुष्का जालिंदर मानकर (२५, येडेमच्छिंद्र ता. वाळवा, जि. सांगली) अशी मृत दोघांची नावे आहेत. काल, रविवारी (दि.४) पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.
याबाबत पाटील यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुल गेल्या चार वर्षापासून महाड एमआयडीसी येथील केमिकल कंपनीत नोकरीत होता. शनिवारी मध्यरात्री काम संपवून तो व त्याची सहकारी अनुष्का घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती महाड पोलिसांनी राधानगरी पोलिसांना दिली. राधानगरी पोलिसांनी राहूलचे वडील वसंत पाटील यांना याबाबत माहिती दिली. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल यांच्या पश्चात आई-वडील दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.