शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
4
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
5
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
6
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
7
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
8
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
9
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
10
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
11
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
12
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
13
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
14
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
15
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
16
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
17
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
18
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
19
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
20
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भरतनाट्यम्मध्ये विश्वविक्रम

By admin | Updated: January 11, 2015 00:47 IST

गिनिज बुकात नोंद : दाक्षिणात्य नृत्यशैलीला मराठमोळ्या कोल्हापूरचा ताज

कोल्हापूर : संध्याकाळची वेळ, मैदानात हजारोंची गर्दी असूनही नीरव शांतता, नाद फक्त एकाच क्षणी, एकाच लयीत वाजणाऱ्या घुंगरांचा... हावभाव-मुद्रा, गुरुर्ब्रह्मा...या मंत्रोच्चाराने सादर झाला मुलींचा पदन्यास. अखेर तो क्षण आला... सगळ्यांनी जणू श्वास रोखून धरला आणि लंंडनच्या फॉर्च्युना बुर्क यांनी नृत्यसंस्कार विश्वविक्रमाची गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे जाहीर केले. रावणेश्वराच्या साक्षीने आज, शनिवारी दाक्षिणात्य नृत्यशैलीत मराठमोळ्या कोल्हापूरने विश्वविक्रम प्रस्थापित केला आणि टाळ्यांच्या कडकडाटात, फटाक्यांची आतषबाजीत जल्लोष साजरा झाला.
तपस्या सिद्धी कला अकादमीच्या सर्वेसर्वा आणि भरतनाट्यम् नृत्यांगना संयोगिता पाटील यांनी पाहिलेले स्वप्न आज कोल्हापुरात शाहू स्टेडियममध्ये साकार झाले. महाराष्ट्रासह गुजरात, बंगलोर, बेळगाव, कर्नाटकमधील २१००नृत्यांगनांनी सायंकाळी सात वाजता पदलालित्याला सुरुवात केली. लंडनहून आलेल्या गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डच्या फॉर्च्युना बुर्क या रेकॉर्डसाठी उपस्थित होत्या. निरीक्षक म्हणून सुप्रसिद्ध भरतनाट्यम् कलाकार जयलक्ष्मी ईश्वर व एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अशोक पाटील यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी महापौर तृप्ती माळवी, श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. अर्ध्या तासानंतर म्हणजे पावणेआठ वाजता फॉर्च्युना बुर्क यांनी हा गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद झाल्याचे जाहीर केले. त्यांच्या हस्ते संयोगिताला हे प्रमाणपत्र देण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय आणि आई अंबाबाईचा गजर झाला.
या विक्रमात सहभागी सर्व नृत्यांगनांनी आणि हा विक्रम अनुभवलेल्या कोल्हापूरकरांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी संयोगिताचे गुरू पंडित टी. रवींद्र शर्मा, प्रथम गुरू अमृता जांबोलीकर, संध्या पुरेचा, ‘रोटरी’चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गणेश भट, अमोल कोरगावकर, भारती विद्यापीठाचे नितीन नायक उपस्थित होते. नर्तना विद्यालयाच्या मुलींनी गणेश वंदना, बंगलोरच्या पार्श्वनाथ उपाध्ये, धनश्री शर्मा यांनी भरतनाट्यम् सादर केले. महाराष्ट्र गीत, पोवाड्याचेही सादरीकरण झाले. पसायदानाने सांगता झाली.