जाती-पातीवरुन समाज बिघडविण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:20+5:302021-02-09T04:26:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : प्रबोधन कार्यशाळेच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला हक्क व अधिकारांची जाणीव निर्माण करून दिली जात आहे. ...

The work of spoiling the society on the basis of caste | जाती-पातीवरुन समाज बिघडविण्याचे काम

जाती-पातीवरुन समाज बिघडविण्याचे काम

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरोळ : प्रबोधन कार्यशाळेच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला हक्क व अधिकारांची जाणीव निर्माण करून दिली जात आहे. मात्र, समाजात काही लोक आदर्शाचा मुखवटा धारण करून माणसाचा मेंदू बधिर करणारी व्यवस्था निर्माण करत आहेत. जात-पात-धर्म या मुद्द्यांवर समाज बिघडविण्याचे काम केले जात असल्याने सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माहिती अधिकार व्याख्याते शाहीन शेख यांनी केले.

शिरोळ येथे तालुका पुरोगामी विचार मंचच्यावतीने बुवाफन मंदिराच्या पटांगणात एकदिवसीय कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती सचिन शिंदे होते. यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

यावेळी राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ, ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेला सलीम जमादार, रामभाऊ लामदाडे, खंडेराव हेरवाडे, सचेतन बनसोडे, दगडू माने, अनिल लोंढे, राजेंद्र प्रधान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The work of spoiling the society on the basis of caste