संजय गांधी निराधार योजना समितीचे काम कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST2021-09-10T04:29:34+5:302021-09-10T04:29:34+5:30

सरूड : निराधार वंचित घटकांना शासन अनुदान मिळवून देण्यासाठी शाहूवाडी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सुरू ...

The work of Sanjay Gandhi Niradhar Yojana Samiti is commendable | संजय गांधी निराधार योजना समितीचे काम कौतुकास्पद

संजय गांधी निराधार योजना समितीचे काम कौतुकास्पद

सरूड :

निराधार वंचित घटकांना शासन अनुदान मिळवून देण्यासाठी शाहूवाडी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सुरू असलेले काम कौतुकास्पद असून यापुढील काळातही या समितीने शासनाच्या योजना तळागाळातील वंचित घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव कार्यरत रहावे, असे आवाहन माजी आमदार सत्यजित पाटील यांनी केले.

शाहूवाडी येथे संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीची पत्रे देण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, सभापती विजय खोत, उपसभापती दिलीप पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील- सोंडोलीकर, भारत पाटील, डॉ . स्नेहा जाधव उपस्थित होते.

फोटो ओळी : शाहूवाडी येथे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीपत्रे वितरणप्रसंगी माजी आमदार सत्यजित पाटील, हंबीरराव पाटील, विजय खोत, भीमराव पाटील, दिलीप पाटील आदी मान्यवर.

Web Title: The work of Sanjay Gandhi Niradhar Yojana Samiti is commendable