बापूसो डोंगळेंचे कार्य मोलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:28 IST2021-09-06T04:28:02+5:302021-09-06T04:28:02+5:30

तंबाखू संघाच्या माध्यमातून सहकारात आदर्श निर्माण करणाऱ्या बापूसो संभाजी डोंगळे यांचे सहकारातील योगदान आदर्शवत आहे. सहकार चळवळ टिकविण्यासाठी त्यांच्या ...

The work of Bapuso Dongle is valuable | बापूसो डोंगळेंचे कार्य मोलाचे

बापूसो डोंगळेंचे कार्य मोलाचे

तंबाखू संघाच्या माध्यमातून सहकारात आदर्श निर्माण करणाऱ्या बापूसो संभाजी डोंगळे यांचे सहकारातील योगदान आदर्शवत आहे. सहकार चळवळ टिकविण्यासाठी त्यांच्या विचाराचे आचरण हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन राधानगरी तालुका काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील-कौलवकर यांनी केले.

घोटवडे (ता. राधानगरी) येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी तंबाखू संघाचे माजी अध्यक्ष कै. बापूसो संभाजी डोंगळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. स्वागत तंबाखू संघाचे उपाध्यक्ष रावसो डोंगळे यांनी केले. प्रास्ताविक अनिल डोंगळे यांनी केले.

यावेळी ‘भोगावती’चे संचालक धीरज डोंगळे, संदीप पाटील, के. द. पाटील, संजय डोंगळे, संतोष देवकर, आदींसह घोटवडे आणि परिसरातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. रावसो डोंगळे यांनी आभार मानले.

फोटो ओळी :

तंबाखू संघाचे माजी अध्यक्ष बापूसो डोंगळे यांना अभिवादन करताना सुशील पाटील-कौलवकर धीरज डोंगळे, केरबा पाटील, शिवाजी पाटील.

Web Title: The work of Bapuso Dongle is valuable