शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र येणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:47 IST

Local Body Election: चर्चा अंतिम टप्प्यात : मंडलिक विरोधात लढणार 

कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिका, नगरपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज, सोमवारी शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यानच कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहु ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत दुपारी तीन वाजता अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत टोकाचा संघर्ष केलेल्या या दोन नेत्यांमध्ये समेट घडविण्यात भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडुन निवडणुक न लढता राजर्षी शाहु आघाडी मार्फत निवडणुक लढतील असेही समजते. नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असणार आहे. मात्र शाहू आघाडीच्यावतीने घाटगे यांचे समर्थक जयवंत रावण यांच्या मातोश्री उषा बाळकृष्ण रावण यांनीही नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरल्याने युतीबाबत सस्पेन्स वाढला आहे.या घडामोडीमुळे भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार संजय घाटगे गटात तीव्र नाराजी पसरली आहे. त्यांच्या उमेदवारांनी भरलेले अर्ज माघार घेतले आहेत. हा निर्णय देखील भाजपाच्या वरीष्ठ पातळीवर झाला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक हे कागलमधाये स्वतंत्र पॅनेल करणार आहेत. असे असले तरी अंतिम क्षणी काहीही घडण्याची शक्यता असल्याने कागल शहरासह जिल्ह्याचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rivals Hasan Mushrif and Samarjitsinh Ghatge may unite in Kolhapur politics?

Web Summary : Minister Hasan Mushrif and Samarjitsinh Ghatge may unite for Kagal's municipal elections. A BJP leader mediated the alliance. Ghatge may contest via Rajarshi Shahu Aghadi with NCP support. Suspense remains as Usha Ravan also filed nomination. This caused resentment in Sanjay Ghatge's BJP group.