घरफाळा चुकविल्याप्रकरणी न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST2021-03-09T04:25:32+5:302021-03-09T04:25:32+5:30

भाजप व ताराराणी आघाडीचे एक शिष्टमंडळ सोमवारी दुपारी प्रशासक बलकवडे यांना भेटले. डीवायपी सिटी मॉलमधील दुकानगाळ्यांचा कुळ वापर असूनही ...

Will go to court for home tax evasion | घरफाळा चुकविल्याप्रकरणी न्यायालयात जाणार

घरफाळा चुकविल्याप्रकरणी न्यायालयात जाणार

भाजप व ताराराणी आघाडीचे एक शिष्टमंडळ सोमवारी दुपारी प्रशासक बलकवडे यांना भेटले. डीवायपी सिटी मॉलमधील दुकानगाळ्यांचा कुळ वापर असूनही मालक वापर असा दाखविला आहे. यापूर्वी दोनवेळा महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. प्रशासक म्हणून आपण या प्रकरणात लक्ष घालून सामान्य माणसांना जो न्याय लावता त्याच पद्धतीने डीवायपी मॉल इमारतीचे असेसमेंट करण्यात यावे. कुळ असलेल्या कराराची तपासणी करावी. कुळ वापरात जो घरफाळा बसतो तेवढा आकारावा आणि दंडासह वसूल करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी दुकानदारांशी झालेले करार, भाड्यासंबंधीची कागदपत्रे, महापालिकेची बिले पुरावे म्हणून प्रशासकांना देण्यात आली.

रमणमळा येथील वॉटरपार्कसाठी देण्यात आलेल्या महापालिकेच्या जागेचा करार दि. ३१ मार्च २०२१ रोजी संपणार आहे. कराराची मुदत संपताच ही जागाही तातडीने ताब्यात घ्यावी, अशी मागणी महाडिक यांनी केली. या जागेचा साडेतीन कोटी रुपयांचा घरफाळादेखील चुकविला आहे. तोही वसूल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शिष्टमंडळात सत्यजित कदम, सुनील कदम, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, किरण नकाते, मारुती माने यांचा समावेश होता.

-म्हशीच्या गोठ्याची चौकशी व्हावी

आम्ही आरोप केल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या बगलबच्च्यांनी आमच्या ‘आदर्शा भिमा वस्त्रम’च्या चौथ्या माळ्यावर म्हशीचा गोठा असल्याचा कांगावा केला आहे. आम्ही तर कापड दुकान सुरू केले आहे. बांधकाम परवानगी तसेच व्यवसाय परवाना घेतेवेळी तशाच नोंद आहेत. म्हशीचा गोठा आहे का याची चौकशी करावी, सत्य समोर यावे. जर नसेल तर तसा खुलासा करावा, असेही यावेळी महाडिक म्हणाले.

-प्रशासकांचे चौकशीचे आश्वासन-

आपण दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे आम्ही चौकशी करतो, असे आश्वासन प्रशासक बलकवडे यांनी दिले. त्याचवेळी त्यांनी रजिस्टर, करारपत्र, जागेची सर्व कागदपत्रे मागवून घ्या, अशा सूचना सहायक आयुक्त विनायक औंधकर यांना दिल्या. यावेळी सर्व अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Will go to court for home tax evasion