आगामी सर्व निवडणुका ताकदीने लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:27 IST2021-08-13T04:27:22+5:302021-08-13T04:27:22+5:30

: गारगोटीत कार्यकर्त्यांचा मेळावा गारगोटी : राधानगरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्यावतीने समर्थ बूथ अभियान सक्षमपणे राबवून प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या ...

Will fight all the upcoming elections vigorously | आगामी सर्व निवडणुका ताकदीने लढवणार

आगामी सर्व निवडणुका ताकदीने लढवणार

: गारगोटीत कार्यकर्त्यांचा मेळावा

गारगोटी :

राधानगरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्यावतीने समर्थ बूथ अभियान सक्षमपणे राबवून प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुका ताकदीने लढविणार असल्याचा निर्धार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल देसाई यांनी व्यक्त केला.

ते गारगोटीच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

राहुल देसाई पुढे म्हणाले, भाजपाच्या वतीने समर्थ बूथ अभियान चालू असून हे अभियान युवक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही सक्षमपणे राबवणार आहोत. पूरग्रस्तांना अजूनही शासनाकडून भरीव स्वरूपात मदत मिळालेली नाही. ही मदत या पूरग्रस्तांना लवकर मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहोत.

यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील, युवा नेते शिवराज देसाई, भाजपचे तालुका सरचिटणीस अनिल तळकर, भाजप शहराध्यक्ष प्रकाश वास्कर, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, संग्रामसिंह पोफळे, निखिल कुलकर्णी, सागर नाईक यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी संभाजीराव नलगे, सुनील खंटागळे, अक्षय सावंत, जितू भाट, सचिन मेटल, शांताराम तौंदकर, साईनाथ कावणेकर, शरद पाटील, विलास माळवेकर, सपंत देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो : १२ गारगोटी देसाई

गारगोटी येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना राहुल देसाई.

Web Title: Will fight all the upcoming elections vigorously