शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला कशाला अडचणीत आणता?

By admin | Updated: November 30, 2014 01:00 IST

महाडिक यांचा सवाल : अपात्र लाभार्थी शोधमोहिमेवर उपरोधात्मक टिप्पणी

 कोल्हापूर : राष्ट्रीय सहायता कार्यक्रमांतर्गत विविध योजनांमध्ये अपात्र लाभार्थी शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. अपात्र असलेल्यांवर गुन्हे दाखल करून पात्र असणाऱ्यांना लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) किरण कुलकर्णी यांनी दिली. यावर खासदार धनंजय महाडिक यांनी निवडतानाच पात्र आहेत की नाहीत, हे का पाहिले नाही? आता अपात्र लाभार्थी शोधमोहीम राबवून आम्हाला कशाला अडचणीत आणता? अशी उपरोधिक टिपणी केली. श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती योजना, विधवा वेतन योजना, आदी योजनांमध्ये सर्वाधिक लाभार्थी कागल तालुक्याचे असल्याचे शासकीय विश्रामगृहात झालेल्या जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत निदर्शनास आले. यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी कमी लाभार्थी असलेल्या तालुक्याचा आर्थिक स्तर उंचावला आहे का, असा सवाल केला. ते म्हणाले, लाभार्थी कमी असलेल्या गावांतील गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार काम करीत नाहीत, असे स्पष्ट होते. अधिक लाभार्थी असलेल्या तालुक्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. मात्र, लाभार्थी कमी असलेल्या तालुक्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सर्व तलाठ्यांना सूचना देऊन पात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यास सांगावे. यावर उत्तर देताना सौ. कुलकर्णी म्हणाल्या, अपात्र लाभार्थी शोधून कारवाई करण्याच्या सूचना शासनाकडून आल्या आहेत. त्यानुसार अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेणे आवश्यक आहे.