शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शाहिरीतून जिवंत ठेवणारे द. ना. गव्हाणकर जनतेचे शाहीर - डॉ. पाटणकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 16:40 IST

लोक संघर्ष मोर्चाच्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे यांना लोकशाहीर द.ना.गव्हाणकर स्मृती पुरस्कार प्रदान

आजरा : संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या शाहिरीतून द. ना. गव्हाणकर यांनी कायमपणे जिवंत ठेवली. त्यामुळेच ते जनतेचे शाहीर होते असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील लोक संघर्ष मोर्चाच्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे यांना लोकशाहीर द.ना.गव्हाणकर स्मृती पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयवंत शिंपी होते.पुरस्कारापाठीमागील भूमिका मुकुंद देसाई तर प्रास्ताविक कॉ. संपत देसाई यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाहीर द.ना. गव्हाणकर व विद्रोही साहित्यिक राजा शिरगुप्पे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. प्रतिभा शिंदे यांचा शाल, श्रीफळ, रोख १० हजार, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजात आपल्या हक्कासाठी लढण्याची जिद्द व ताकद प्रचंड आहे. मात्र त्यांच्यात भूक, भिती व भ्रम निर्माण करून त्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. त्यासाठी संसदीय पद्धतीत काम करणाऱ्यांचे डोकं ठिकाणावर आणले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन पुरस्काराला उत्तर देताना प्रतिभा शिंदे यांनी केले. पूर्वी लोकांमध्ये जनजागृतीसाठी शाहिरी कला होती मग आता ही शाहिरी कला गेली कुठे ? असा सवाल करून यापुढील काळात शाहीर घडविणारी कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन केले पाहिजे असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले. कार्यक्रमास किसन कुराडे, स्वाती कोरे, सुधीर देसाई, अल्बर्ट डिसोझा, शिवाजी बोलके, रावसाहेब देसाई, राजू होलम, बंडोपंत चव्हाण, डॉ.कृष्णा मेणसे, प्राचार्य जे. बी.पाटील, अमर चव्हाण, विद्याधर गुरबे, एम.के. देसाई, रणजीत देसाई, अनिकेत चराटी, संग्राम सावंत, संजीवनी सावंत, नितीन पाटील, सुनिल पाटील यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सौ. सुतार तर आभार संजय घाटगे यांनी मानले.सामाजिक चळवळीतील शेवटचा पुरस्कार आदिवासींच्या अन्यायाविरोधात लढा देत सामाजिक चळवळीत काम करीत आहे. त्यामुळेच द.ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार आज देण्यात आला. आता काँग्रेस पक्षात मी प्रवेश केलेला असल्याने सामाजिक चळवळीतील हा शेवटचाच पुरस्कार असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी सांगताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर