शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

शववाहिका कमी पडल्यावर कोल्हापूरकर लगेच धावले;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यावर शववाहिकेसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने कुटुंबीयांची अस्वस्थता ...

विश्वास पाटील -

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यावर शववाहिकेसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने कुटुंबीयांची अस्वस्थता वाढते, अशी बातमी प्रसिध्द होताच गतवर्षी महापालिकेच्या मदतीसाठी कोल्हापूरकर धावून आले आणि त्यातून १० शववाहिकांची व्यवस्था झाली. अशी बांधिलकी अन्य शहरांत लोकांकडून जोपासली जात नसल्याचे चित्र मंगळवारी पुढे आले. त्याला अंबाजोगाई (जि. बीड) येथील घटनेची पार्श्वभूमी आहे. तिथे शववाहिका न मिळाल्याने २२ कोरोना रुग्णांचे मृतदेह ट्राॅलीमध्ये उसाच्या मोळ्या भरून न्याव्यात तसे एकाच रुग्णवाहिकेतून भरून अंत्यसंस्कारासाठी नेल्याची संतापजनक व मानवतेची विटंबना करणारी घटना घडली आहे.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना अंत्यसंस्कारास नेण्यासाठी मुळात शववाहिकाच नाही. रुग्णवाहिकाच शववाहिकेचे काम करते, हे तर भयंकरच आहे. या रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी १७ मार्चला रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतु त्या अद्याप मिळाल्या नाहीत. गतवर्षी कोरोनाचा कहर वाढल्यावर कोल्हापुरातही अशीच स्थिती होती. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे फक्त ३ शववाहिका होत्या. त्यादेखील जुन्या असल्याने नादुरुस्त होत्या. कोरोना बळी वाढल्यावर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना नातेवाईकांना जीवघेणी प्रतीक्षा करावी लागत असे. हे समजल्यावर तातडीने येथील अयोध्या डेव्हलपर्सचे मालक व्ही. बी. पाटील व घाटगे ग्रुपचे मालक तेज घाटगे धावून आले. व्ही. बी. पाटील यांच्याकडे कॅश‌‌व्हॅन होती. ती त्यांनी महापालिकेच्या नावावरच करून दिली. घाटगे यांनी नवीनच गाडी घेऊन दिली. त्यासाठी प्रत्येकी १२ लाख रुपये दोघांनी खर्च केले. महापालिका यंत्रणेचा मोठा ताण त्यामुळे कमी झाला. सगळे सरकारनेच करावे, आम्ही फक्त तक्रारी करणार, ही वृत्ती कोल्हापुरात नाही. सामान्य नागरिकापासून उद्योजक, व्यापारी सर्व स्तरातील लोक संकटात धावून येत असल्याचा अनुभव कायमच येतो.

याशिवाय काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांनी स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी २ शववाहिका युध्दपातळीवर यंत्रणा लावून तयार करून दिल्या. पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीन व हसन मुश्रीफ फाऊंडेशनने एक शववाहिका ग्रामीण भागासाठी उपलब्ध करून दिली. अशी मदत अंबाजोगाईमध्ये किंवा अन्य कोणत्याही शहरात झाली, तर मृतदेहांची विटंबना टाळता येऊ शकते.

कोल्हापुरात एकाचवेळी जास्तीत जास्त ३ मृतदेहच शववाहिकेतून नेले जातात. चालकाने एकदा पीपीई कीट घातला की त्याचा जीव कासावीस होतो. त्यामुळे एकाच भागातील दोन-तीन मृतदेह असतील, तर आम्ही ते नेत आहे. मृतदेहाची हेळसांड होऊ नये यासाठी सर्वजणच काळजी घेतात.

- रणजित चिले

मुख्य अग्निशमन अधिकारी

कोल्हापूर महापालिका

फोटो : २७०४२०२१-कोल-शववाहिका

कोल्हापुरात गतवर्षी शववाहिकांची टंचाई असल्याचे लक्षात आल्यावर अयोध्या डेव्हलपर्सचे मालक व्ही. बी. पाटील यांनी कॅशव्हॅन शववाहिका म्हणून उपलब्ध करून दिली. त्यातून महापालिकेचा ताण कमी झाला.